हिंदूधर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूपच महत्व आहे. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात, की भगवान विष्णुंना सुद्धहा तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पांनांशिवाय भगवान विष्णुंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही. असे मानले जाते, की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते. तर तुम्हाला हे माहीत आहे का, तुळशीला पाणी घालताना एका मंत्राचे पठन करायचे असते, ज्यामुळे घर धन-धान्याने भरून जाते. हा मंत्र फक्त तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत.
धार्मिक ग्रंथांनुसार जर तुळशीला पाणी घालताना ‘ॐ-ॐ’ ह्या मंत्राचे ११ किंवा २१ वेळा जप केला, तर वाईट नजरेपासून बचाव होतो. त्याचबरोबर, घरात धन व धान्य यांची वृद्धि होते. विष्णु भगवानच्या पूजेला तुळशीची पाने अर्पण करणे खूपच जरूरी आहे. म्हणूनच, तुळशीची पाने खुडताना ॐ सुभद्राय नम:, मातस्तुलसि गोविन्द हृदयानन्द कारिणी,नारायणस्य पूजार्थं चिनोमि त्वां नमोस्तुते। या मंत्राचा जप करावा. यामुळे पूजेचा दुहेरी फायदा मिळतो.
जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी, महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते। या मंत्राचा जप करावा. त्यामुळे, तुम्हाला प्रगतिच्या नवीन वाटा खुल्या होतील. जर कोणाला वाईट नजर लागली असेल, तर त्याच्या डोक्याकडून पायापर्यंत ७ तुळशीची पाने आणि ७ काळी मिरीचे दाणे २१ वेळा उतरवून घ्या आणि ते नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून द्या. त्यामुळे, वाईट नजरेपासुन बचाव होईल.
भगवान विष्णुंना तुळशी वाहताना त्यांना चन्दन लावा, त्यामुळे भगवान विष्णु प्रसन्न होतील. असे केल्यामुळे, घरात समृद्धि येईल व सुख शांति नांदेल. आपल्या हिंदू धर्मात तुळशीत तिन्हिसांजेला दिवा लावण्याची प्रथा आहे. तुळशीची पुजा करताना शुद्ध देशी तुपाचा दिवा जरूर लावा, त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरात समृद्धि येईल.
हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठे महत्त्व आहे. असे म्हणतात की भगवान विष्णूचे अवतार श्री कृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले. तुळशीच्या पानांशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाही. भगवान विष्णुंना तुळशीचे पाणी घालताना त्यात चन्दन मिसळा, त्यामुळे भगवान विष्णु प्रसन्न होतील आणि घरात समृद्धि येईल.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.