मानवी शरीर कार्यशील आणि स्वस्थ बनवण्यासाठी हे अत्यंत जरूरी आहे, की आपल्या शरीरात शुद्ध व स्वछ रक्तप्रवाह चालू राहिला पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास आपण नक्कीच आजारी पडू शकतो. आपले यकृत याबाबतीत खूप महत्वाचे आहे. यकृत (लिव्हर) रक्ताचे रक्ताभिसरण करून ते शुद्ध ठेवते.
अन्नपचनाची क्रिया आणि रक्ताचे रक्ताभिसरण ही यकृतद्वारे केलेली दोन प्रमुख कार्ये आहेत. रक्ताभिसरणाचे काम हे दूषित पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती सारखेच आहे. शरीरात तयार होणारी विषारी द्रव्ये किंवा भोजनामुळे तयार होणारी विषारी तत्वे हे रक्तातून दूर करण्याचे कार्य याची जबाबदारी यकृताची असते. यकृत शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचे कार्य करून आपले रक्त शुद्ध ठेवते.
जे भोजन आपण करतो, ते शरीरात पोहोचल्यावर, त्यातून जो अन्नाचा ज्यूस बनतो, तो शरीरात सरळ जमा न होता, गॉल ब्लैडर मध्ये एकत्र होतो. गॉल ब्लैडर हे फक्त साठा करण्याचे काम करते. तिथे कोणतेही कार्य घडत नाही. जोपर्यंत अन्नरस त्यात जमा होत राहतो, तोपर्यन्त तो भरत नाही. पण एकदा का गॉल ब्लैडर भरले की ज्यूस यकृताकडे जायला लागतो. यकृत अन्नरसामधून विषारी द्रव्ये काढून ती मळ नलिकेत टाकते.
यकृत आपल्या शरीरात उत्पन्न होणारी विषारी द्रव्ये रक्ताभिसरण प्रक्रियेने रक्तातून शोषून घेऊन शरीराच्या बाहेर टाकते. तुम्ही आत्तापर्यंत हे शिकला आहात, की आपल्या शरीरातील रक्ताची निर्मिती विविध पेशींद्वारा झाली आहे. त्यांचा जीवनकाळ 120 दिवसाचा असतो. त्या कालावधीनंतर त्या आपोआप नष्ट होतात. रक्तातील या पेशी जशा नाहीशा होतात, त्यामध्ये टोकसीन्स उत्पन्न व्हायला सुरुवात होते. पण यकृत जर खराब झाले तर मात्र शरीराची कार्यक्षमता कमी होते. शरीराला थकवा जाणवतो.
एकुट (acute) आणि क्रोनिक हैपेटायटीस हे यकृतचे आजार आहेत, जे वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतात. हैपेटायटीसमध्ये शरीरात विषाणू उत्पन्न होतात, जे डॉक्टरी भाषेत ए, बी, सी, डी आणि ई या वर्गात विभागले जातात. यकृताच्या आजारात एक आठवडा साखर किंवा मीठ याचा वापर कमी प्रमाणात करा. तसेच दुधात मनुका घालून दूध गोड करून प्या. पोळी शक्यतो खाऊ नका. भाज्या मसाला न घालता खा. जास्त करून पालक, गाजर, टोमॅटो, कारली , दुधी या भाज्या खाणे हितकारक आहे.
पण यकृताची काळजी घेण्यासाठी तुमच्या भोजनात पपई, आवळा, सफरचंद ज्यूस घेणे जरुरि आहे. कारण ते रक्त शुद्ध करायला मदत करतात. तेल, तूप या गोष्टींचा वापर अगदी कमी प्रमाणात करा.
मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली तर कमेंट करून सांगा आणि लाईक व शेयर नक्की करा. अश्याच माहितीपूर्ण पोस्टसाठी आमचे पेज नक्कीच लाईक करा.