मराठी इंडस्ट्रीमधील खऱ्या बहिणी ज्या दोघी आहेत उत्तम अभिनेत्री…

नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी चित्रपट सृष्टी आणि मालिकांच्यामध्ये बहिणींच्या जोड्या पाहणार आहोत. अश्या बहिणी ज्यांनी चित्रपट सृष्टी आणि मालिका मध्ये नाव कमावलं.आणि एकमेकांना साथ दिली.चला तर मग पाहुयात…
सद्या मराठी चित्रपट व मालिका मध्ये चर्चेत असलेली जोडी म्हणजे देशपांडे बहिणींची..! मृण्मय देशपांडे आणि गौतमी देशपांडे. मृण्मय ने आतापर्यंत मोकळा श्वास, कट्यार काळजात घुसली, शिकारी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर तिच्या पाऊलांवर पाऊल टाकत आता गौतमी देखील मालिकांच्या विश्वामध्ये उतरली आहे.

गौतमी ने या आधी ‘सारे तुझ्याच साठी’ या मालिकेमध्ये काम केलं होतं. आणि आता “माझा होशील ना” ही झी मराठी वरील मालिका ती घेऊन आली आहे. या मालिकेमध्ये ती सुंदर दिसतच आहे त्याचबरोबर अभिनय करत आहे. गौतमी आणि मृण्मय या एक उत्तम अभिनेत्री आहेत.

छोट्या पडद्यावरती दिसून येणाऱ्या काही बहिणीनं पैकी आणखीन एक जोडी खूप प्रसिद्ध आहे. ती म्हणजे खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे. खुशबू आपल्याला ‘आम्ही दोघी’ या मालिकेत दिसून आली होती. तर तितिक्षा आपल्याला ‘ तू अशी जवळी रहा’ या मालिकेमध्ये दिसून आली होती. दोघींचे सोशल मीडिया वरील फोटो पाहून आपल्याला त्यांच्यामधील बॉंडिंग दिसून येईल.

पुढची जोडी आहे भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते. या दोघी बहिणी असून मालिकेमध्ये आणि चित्रपटांमध्ये कामे करतात. वहिणीसाहेब या मालिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली, त्यात चार दिवस सासूचे, अनुबंध, असंभव, या मालिकेमध्ये भार्गवी दिसून आल्या होत्या. तर चैत्राली हिंदी मालिकेमध्ये सुद्धा दिसते. ये रिश्ते हैं प्यार के, मध्ये चैत्राली आपल्याला दिसली होती. तर श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटामध्ये चैत्राली यांनी उत्तम काम केलं आहे.

पुढची झोडी आहे पल्लवी वैद्य आणि पौर्णिमा भावे या दोघी बहिणी आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत पुतळा बाईंची भूमिका अभिनेत्री पल्लवी वैद्य यांनी साखारली होती. ही भूमिका सर्वानाच खूप आवडली होती. त्यानंतर त्यांची बहीण पौर्णिमा यांनी ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमध्ये बेबी आत्या हे पात्र साखारल होत. त्या काळात बेबी आत्या हे पात्र खूप महत्त्वाचे आणि टुर्निग पॉईंट देणार अस ठरलं होतं.

पुढची जोडी आहे जेष्ठ अभिनेत्री सर्वात लाडकी वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर या दोघी बहिणी आहेत. अभिनेत्री वंदना गुप्ते काही दिवसांपूर्वी आपल्याला हे मन बावरे या मालिकेमध्ये दिसून आल्या होत्या. तर याच बरोबर टाइम प्लिज, लपंडाव, फॅमिली कट्टा, यांसारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा वंदना गुप्ते यांनी उत्तम काम केलं होतं. भारती आचरेकर यांनी सुद्धा सनई चौघडे, अर्धांगिनी, या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर संजोग, अपने अपने, पराये, ईश्वर, यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा दिसून आल्या होत्या.

तर या होत्या सुप्रसिद्ध चित्रपट आणि मालिका मध्ये काम करणाऱ्या बहिणींच्या जोडी. या पैकी कोणत्या बहिणीची झोडी तुम्हाला आवडते हे नक्की आम्हाला कॉमेंट करून सांगा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *