आचार्य चाणक्य यांच्या मते सुंदर पत्नी शत्रूसमानच असते कारण कि ती…..

आचार्य चाणक्यांजवळ ज्ञानाची अजिबात कमतरता नव्हती. त्यांची नीतीमूल्ये सर्वपरिचित आहेत. त्यांनी नीतीमूल्यांचा खूप अभ्यास केलेला आहे. त्यांच्या “चाणक्यनीती” या पुस्तकाद्वारे आपण ती वाचू शकतो. त्यांनी आपल्या नीतीमूल्यांमध्ये अशा लोकांबद्दल सांगितले आहे, की जे तुमचे नातलग तर आहेत, पण कधीतरी तुमचे सगळ्यात मोठे शत्रू ठरू शकतात.

चाणक्य आपल्या स्वत:च्या राजनीतिबद्दल लोकांना परिचित आहेतच. तसेच, ते त्यांच्या ज्ञानासाठी देशभरात सर्वाधिक सन्माननीय व्यक्तिच्या रूपात ओळखले जातात. त्यांच्याजवळ ज्ञानाची काहीच कमतरता नाही. त्यांनी अनेक लोकांचा जवळून अभ्यास केला आहे. त्यांच्या नीतीमूल्यांमध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या लोकांना समाविष्ट केलेले आहे. त्यांनी आपल्या नीतीमूल्यांमध्ये अशा लोकांबद्दल सांगितले आहे, की जे आपले सगळ्यात मोठे शत्रू ठरू शकतात. ते असे का म्हणत असतील, कारण त्यांनी जवळून लोकांचा अभ्यास केला आहे. चला तर मग, जाणून घेऊया कोण आहेत अशा व्यक्ति?

ऋणकर्ता पिता शत्रुर्माता च व्यभिचारिणी। भार्या रूपवती शत्रु: पुत्र: शत्रुरपण्डित: चाणक्यांच्या या श्लोकानुसार जो पिता कोणत्याही कारणासाठी दुसर्‍याकडून कर्ज घेतो, तो पिता कोणत्याही शत्रूपेक्षा कमी नसतो. याचबरोबर, चाणक्यांनी असाही उल्लेख केला आहे, की खरे म्हणजे, एका वडिलांचे हे कर्तव्य असते, की आपल्या मुलांचे पालन पोषण उत्तम रीतीने करणे. त्यांना योग्य शिक्षण देऊन, स्वत:च्या पायावर उभे करणे, जरूर असेल व मुलाची कुवत असेल, तर त्याला उच्च शिक्षण देणे. पण, जर वडिलांनी दुसर्‍याकडून कर्ज घेऊन मुलाच्या शिरावर हा कर्जाचा बोजा दिला, तर पुढे मुलालाच ते फेडावे लागेल. हे मुलासाठी खूपच कष्टदायी होऊ शकते. जर वडील कर्ज नाही फेडू शकले, तर त्यांचा बोजा मुलाच्या डोक्यावर येतो. असा पिता मुलासाठी शत्रूप्रमाणेच असतो.

मुलांमध्ये भेदभाव करणारी आई: जी आई आपल्या मुलांमध्ये भेदभाव करते, जी आई आपल्या सगळ्या मुलांना एकसारखी वागणूक देत नाही, अशी आई मुलांचे पालनपोषण पण व्यवस्थित करू शकत नाही. भेदभाव करणारी आई आपल्या मुलांसाठी धोकादायक सिद्ध होऊ शकते. तसेच कोणत्या महिलेचे कोणत्याही पुरुषाबरोबर अनैतिकसंबंध असतील, तर अशी आई परिवाराबरोबरच तिच्या मुलांसाठी पण धोकादायक ठरू शकते. तिचे नकळत घराकडे दुर्लक्ष होऊ लागते. जास्तीत जास्त वेळ ती घरच्या बाहेर घालवते.

पत्नीचे खूप सुंदर असणे पतिसाठी अडचणीचे ठरु शकते. विशेषकरून, जर अशा वेळी, जेव्हा पती कमजोर असेल, आणि त्याला स्वत:च्या रक्षणासाठी दुसर्‍यांच्या मदतीची जरूर पडत असेल. तर, चाणक्याच्या मतानुसार, कमजोर पतिसाठी सुंदर पत्नी कोणत्याही शत्रूपेक्षा कमी नाही. जर पती कमकुवत असेल आणि तिचे संरक्षण करण्यास असमर्थ असेल तर एखाद्या स्त्रीची अत्यंत सुंदरता तिच्या पतीसाठी एक मोठी समस्या बनते. कमकुवत व अक्षम पुरुषासाठी स्त्री ही शत्रूसारखीच असते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *