तुळस ही कोठेही मिळणारी वनस्पती आहे. त्यात पांढरी व काळी तुळस असे दोन प्रकार आहेत. दूध जसे पोषणासाठी अमृतसमान आहे, तसेच तुळशीचा औषध म्हणून उपयोग केला जातो. ती तुमची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते आणि अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवते. दूध आणि तुळशीचे एकत्रितपणे घेणे हे पोषण आणि आजारांपासून बचाव हे दोन्ही फायदे आहेत. आम्ही तुम्हाला याबद्दल विस्ताराने माहिती दिली आहे, जे अजमावून तुम्ही तुमची अनेक आजारांपसून सुटका करून घेऊ शकता- बघा करून, नक्कीच फायदा होईल.
तुळशी घातलेले दूध सकाळी अंशपोटी सेवन केले पाहिजे. नियमित पाने तुळशी घातलेले दूध प्यायल्याने हृदयाचा कोणताही आजार होत नाही. तुळशीमध्ये अॅंटीबयोटिक्स गुणधर्म असतात, जे तुमची रोगप्रतीकरक शक्ति वाढवायला मदत करतात. रोज तुळशीचे दूध घेण्याने कॅन्सर सारखा आजार होण्याची संभावना कमी होते. यात सापडणारे अॅंटीओक्सिडेंट तत्व कॅन्सर पेशींना मूळापासून नष्ट करतात.
किडनीस्टोन : किडनीस्टोन मध्ये तुळशी घालून दूध प्यायल्यामुळे तो त्रास नष्ट होतो. ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांनी तुळस घातलेले दूध नियमित सकाळ संध्याकाळ घेतले पाहिजे. ७ दिवस नियमित जर असे दूध घेतले, तर स्टोन विरघळून जातो व आपल्याला आराम पडतो.
खोकला: घरात जर कोणाला खोकल्याचा त्रास असेल, तर ३ ग्लास पाण्यात १० ते १५ तुळ्शीची पाने घालून ते पाणी उकळा. जो पर्यन्त पाणी १/३ होत नाही तोपर्यंत उकळा आणि खोकला झालेल्या व्यक्तिला ते दिवसातून २ ते ३ वेळा प्यायला द्या, खोकला एकदम बरा होईल.
मायग्रेनच्या दुखण्यावर उपयोगी: डोके जर खूप दुखत असेल किंवा मायग्रेन ची समस्या असेल, तर दुधात तुळशीची पाने घालून ते दूध घेतले, तर तुमची डोकेदुखी थांबू शकते. दररोज जर हे तुम्ही दूध व तुळशीची पाने एकत्र सेवन केले, तर तुमची ही डोकेदुखी कायमची थांबू शकते.
जीवनातील ताणतणाव : ताणतणाव हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. नौकरी, शिक्षण, स्पर्धा सगळीकडे चढाओढ आहे. रोजचा लोकलचा प्रवास, त्यानंतर जिथे जायचे आहे तिथे वेळेत पोहोचणे या सर्व बाबींमुळे ताणतणाव निर्माण होतोच. पण जर तुम्ही दूध व तुळशीची पाने हे एकत्र उकळवून ते दूध नियमित घेतले, तर तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. तुम्हाला त्याने खूप आराम पडू शकतो.
कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. त्यामुळे लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या शिवाय कोणतेही पाऊल उचलू नये मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.