झोप एक आरामदायी अवस्था. झोप घेणे आपल्यासाठी तितकेच महत्वपूर्ण आहे, जितके आपल्यासाठी अन्न, वस्त्र, व निवारा आहे. आपल्या रोजच्या दिनचर्येत खाणे, पिणे, काम करणे, पैसा कमावणे ह्या गोष्टी तर करतोच, तसेच एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेणे, दानधर्म करणे सर्व काही चालू असते. पण कधी विचार केला आहे का, की निसर्गाने आपल्याला दिवस आणि रात्र यांची रचना करून दिले आहे, ती यासाठी की दिवसभर आपण खूप काम करावे व रात्री थकलेल्या शरीराला आराम द्यावा. ज्यामुळे आपल्या शरीराला योग्य आराम मिळेल व आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. म्हणूनच, वयानुसार झोप घेणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. तेव्हाच खर्या अर्थाने आपल्याला शारीरिक स्वास्थ्य लाभेल. तर मग जाणून घेऊया, आपल्या वयानुसार आपण किती तास झोपले पाहिजे.
नवजात शिशुपासून ते ३ वर्षाच्या बालकापर्यंत: ३ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या बालकाला १३ ते १५ तासाच्या झोपेची आवश्यकता असते. तेवढी झोप जर पूर्ण नाही झाली, तर ते सारखे रडते. जर तुमचे बाळ यापेक्षा कमी वेळ झोपत असेल, तर त्याला काहीतरी होते आहे, त्याचे पोट दुखत असेल किंवा पोटात जळजळ होत असेल. ते बोलू शकत नाही, त्यामुळे ते खूपच चिडचिडेपणा करेल.
४ ते ७ वर्षाच्या बालकांसाठी: ४ ते ७ वर्षाच्या मुलांसाठी ११ ते १२ तासाची झोप जरूरी आहे. कारण तेव्हा बालक शाळेत शिशुवर्गात जायला लागलेले असते. बाहेरच्या जगाशी त्याची ओळख झालेली असते. खेळणे, मुलांबरोबर मस्ती यामुळे ते दमत असते. त्यामुळे त्याला त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी झोप आवश्यक असते. त्याच्या बुद्धीला त्यामुळे चालना मिळते.
७ ते १८ वर्षाच्या मुलांसाठी: ९ ते ११ तासांची झोप या किशोरवयाच्या व बाकी मुलांसाठी उत्तम आहे. आजकाल, मुलांना वेगवेगळ्या क्लासेसना पालक घालतात. यामुळे, त्यांचा बौद्धिक विकास व्हायला खूपच मदत होते.
१८ ते ३० वर्षाच्या मुलांसाठी: १८ ते ३० वर्षांमधील माणसांसाठी ७ ते ९ तासाची झोप जरूरी असते. ते उच्च शिक्षण किंवा एखादा स्पेशल कोर्स करीत असतात. त्यामुळे त्या दरम्यान त्यांच्या शरीराला योग्य तो आराम मिळाला पाहिजे, यासाठी झोप आवश्यक आहे.
३० वर्षाच्या वरील लोकांसाठी: ६ ते ८ तास झोप ३० वर्षावरील लोकांसाठी आवश्यक आहे. या वयात ते नौकरी किंवा व्यवसायात असतात. त्यांची दगदग होत असते. झोप पुरेशी झाली, तर त्यांचे शरीर स्वस्थ राहाते आणि ताणतणावापासून त्यांना आराम मिळतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.