काही व्यक्तींच्या हातात कधीही पैसा टिकून राहात नाही. तसे तर, प्रत्येक माणसाची अशी इच्छा असते, की त्याचे जीवन सुखकारक व्हावे आणि त्याला त्याच्या जीवनात पैशाची कधीच कमतरता पडू नये. त्यासाठी, कितीही कष्ट करण्याची त्याची तयारी असते. परंतु, होते काय, की दिवसरात्र मेहनत करूनही तो आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही व स्वत:वर नाराज होतो. रामायणात पण ह्या गोष्टींचे विवेचन केले आहे, की माणसांच्या हातात पैसा का टिकत नाही. हे लेख पूर्ण वाचा, म्हणजे रामायणातील काही उल्लेखानची तुम्हाला पण प्रचिती येईल. पाहूया मग, काय आहे सत्य:
रामायणात सांगितल्याप्रमाणे जर तुमचा जीवनसाथी योग्य नसेल, तरी सुद्धहा तुमच्या हातात पैसा टिकत नाही. या गोष्टीची आपल्याला माहिती आहे, की अशी एक म्हण आहे, की जेव्हा मुलगी घरात लग्न होऊन येते, तेव्हा ती घराचा स्वर्ग बनवू शकते किंवा तुम्हाला बरबाद करून घरचा नरकही बनवू शकते. ही फक्त म्हण नाही, तर हे सत्य आहे, की मुलगी घर सावरू पण शकते, तसेच नेस्तनाबुत करू शकते. हे पुर्णपणे तुम्हाला कशी जीवनसाथी मिळते त्यावर अवलंबून आहे. तुमच्या जीवनसाथी जर योग्य, समंजस व घर जोडून ठेवणारी असेल, तर घराचा स्वर्ग बनु शकतो. तिच्या येण्याने अनावश्यक खर्च नियंत्रित होतो की नाही, यावर सुद्धहा काही गोष्टी ठरतात.
रामायणानुसार जर माणूस हावरट किंवा लालची प्रवृतीचा असेल, तर त्याच्या हातात पैसा टिकत नाही. तसेही, असे म्हटले आहे, की “ हव्यास ही अत्यंत वाईट गोष्ट आहे”. यासाठी, आपल्याला सुद्धहा जीवनात काही मिळवायचे असेल , तर हव्यासी वृती सोडली पाहिजे आणि धर्माप्रमाणे वागले पाहिजे. कारण, देवसुद्धहा धर्मानुसार वागणार्यांची साथ देतो. म्हणून, कायमच धर्माने वागले पाहिजे.
रामायणात असा उल्लेख केला आहे, की कोणत्याही व्यक्तिला स्वत:बद्दल अनावश्यक गर्व नसावा. कारण, जिथे गर्व असेल, तिथे पैसा टिकत नाही. जर कोणत्याही गर्विष्ट व्यक्तीकडे पैसा असेल, तरी तो टिकून राहत नाही, कारण माता लक्ष्मी पण अशा ठिकाणी निवास करते, जे स्वछ मनाचे असतात. ज्यांच्या मनात दुसर्याबद्दल कपट नसते.
रामायणात ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे, की व्यसन व्यसनाला मारक ठरते. व्यसन करणार्या व्यक्तींना कोणत्याच गोष्टीचे ताळतंत्र नसते. त्या व्यक्ति कधीही धर्मानुसार किंवा खर्या वागत नाहीत. जी व्यक्ति आपल्या जीवनात व्यसन करते, त्या व्यक्तीच्या आयुष्यात धन टिकत नाही. जरी त्या व्यक्तीकडे भरपूर धन असेल, तरी त्यांच्या व्यसनामुळे ते धन लवकरच संपुष्टात येते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.