हा एक शब्द तुम्हाला पैसा, यश, आनंद, ऐश्वर्य सर्व काही मिळवून देईल…

मित्रांनो ज्या एका शब्दाने माझ्या आयुष्यात बदल केले. ज्या एका शब्दाने शेकडो लोकांना यशस्वी आणि करोडपती बनविले. तो एक शब्द तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवला तर तुम्हाला आयुष्यात हवं ते मिळवून देईल. तस पाहिला गेले तर ह्या शब्दाचा उपयोग लोक नेहमी करतात. मित्रांनो एक मोठी संस्था असते. त्यांनी त्यांच्या एका जुन्या वास्तूचा लिलाव ठेवलेला असतो. या लिलावासाठी शहरातील सर्व प्रकारचे, सर्व स्थरातील लोक आलेले असतात.

लिलाव यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील एका मोठा व्यावसायिकाला बोलावले असते. सर्वाना माहिती असते हा व्यवसाय खूप हालकीच्या परिस्थितीत, कष्ट करून मोठा झालेला असतो.अब्जाधीश झालेला असतो. लिलाव चालू व्हायच्या आधी त्या व्यावसायिकाचे स्वागत वगेरे होते. मग लोकांमधला एक जण त्या व्यावसायिकाला प्रश्न विचारतो. की एवढ्या अवघड परिस्थितीतुन तुम्ही एवढे मोठे कसे झालात. तुमच्या यशाचे रहस्य काय आहे.

तेव्हा तो व्यावसायिक थोडा हसतो, आणि तो एका कागदावर फक्त एक शब्द लिहितो. आणि तो कागद एका पाकीटा मध्ये ठेवतो.आणि म्हणतो, आज जो कोणी या वास्तूवर सर्वात जास्त बोली लावेल त्याला हे पाकीट दिले जाईल. ज्याच्या मध्ये माझे आतापर्यंतच्या रहस्यचे गुपित आहे. सर्वाना उत्सुकता लागते. काय असेल तो शब्द? बोली चालू होते. प्रत्येक जण जास्तीत जास्त बोली लावण्याचा प्रयत्न करतो. 10 लाखापासून बोली चालू होते. मग कोण 12 लाख लावते, कोण 14 लाख लावते तर कोण 17 लाख, कोण 24 लाख कारण प्रत्येकाला त्या वास्तू पेक्ष्या तो सिक्रेट शब्द जाणून घायचा असतो. मग एक जण तो फक्त सिक्रेट शब्द जाणून घेण्यासाठी 25 लाखाची बोली लावतो. आणि मग 25 लाख अंतिम रक्कम म्हणून घोषित होते.

त्या माणसाला त्या वास्तूची चावी आणि ते पाकीट ज्या मध्ये तो सिक्रेट शब्द असतो ते दिले जाते. तो माणूस खूप खुश होतो. आणि ते पाकीट उघडून बघतो. या पाकिटामध्ये फक्त तीन अक्षरी शब्द असतो. तो म्हणजे विचारा….हो तुम्ही बरोबर वाचले. विचारा..त्या माणसाला या शब्दामागचे गुपित समजते. जसे सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे त्याला वास्तू मध्ये जास्त रुची नसते. त्याला तो शब्द जाणून घायचा असतो. मग तो स्टेजवरच त्या शब्दाचा प्रयोग करतो. तो तिथे जमलेल्या सर्व लोकांना म्हणतो. मला आयुष्यात यशस्वी होण्याचा शब्द समजला आहे.

हा शब्द कोणाला जाणून घायचा असेल, तर जाची दुसऱ्या नंबर ची बोली होती. त्याला मी ही वास्तू आणि शब्द द्यायला तयार आहे. दुसऱ्या नंबर ची बोली 24 लाख रुपयांची असते. लगेच तो दुसरा माणूस सुद्धा तयार होतो. मित्रांनो हा तीन अक्षरी शब्द तुम्हाला आयुष्यात हवं ते मिळून देईल. पण आपण आयुष्यात जे पाहिजे ते विचारतच नाही. शाळेत असताना खूप प्रश्न पडतात. पण भीती वाटते, शिक्षकांना विचारले तर मुलं हसतील, नाव ठेवतील घरच्यांना विचारले तर घरचे ओरडतील, अश्या प्रकारे प्रश्न विचारणे हा खूप मोठा गुणा आहे, ही समजूत घेऊन आपण मोठे होतो.

पण मी म्हणतो तुम्ही विद्यार्थी असाल तर बिनदास्त जो पर्यंत तुम्हाला विषय कळत नाही तो पर्यंत प्रश्न विचारा. मग ते शिक्षक असतील,घरचे असतील किव्हा तुमच्यापेक्षा कोणतीतरी हुशार असेल. नोकरी करत असाल आणि प्रमोशन पाहिजे असेल बॉस ला विचारा. व्यवसाय करत असाल ग्राहकांना विचारा. आम्ही जे प्रोडक्ट देतोय त्यांनी तुम्ही खुश आहेत का? तुम्हाला अजून कोणत्या प्रोडक्टची गरज आहे का? तुम्हाला नेराश्य आले असेल तर जवळच्या व्यक्तीला विचारा. मित्राला विचारा काय उपाय करता येईल.

एखादी वस्तू विकत घेत असाल डिस्कोउंट किती देणार विचारा. तुम्हाला तुमच्या हिताची कोणतीही गोष्ट हवी असेल विचारत जा .तुम्हाला व्यवसाय करायचा आहे एखाद्या यशस्वी उद्योजकाला जाऊन विचारा. तुम्ही कस चालू केल मला मदत हवी आहे. तुम्हाला जा क्षेत्रात पुढे जायचे आहे त्या क्षेत्रातील उद्योजकान विचारा. त्यांच्याकडून ज्ञान संपादन करा.

आज बरेच लोक अहंकारामुळे किव्हा लोक काय म्हणतील या कारणाने विचारायला घाबरतात. पण जास्तीत जास्त काय होईल. तुम्ही विचारले तर समोरचा नाही म्हणेल, ठीक आहे ना यात अपमानीत होण्यासारखे किंव्हा लाज वाटून घेण्यासारखे काहीच नाही. चाणक्याने सांगितले आहे ‘ज्ञान घेण्यासाठी माणसाने निर्लज्य झाले पाहिजे’. तरच तो यशस्वी होईल.

अजून एक महत्वाचा मुद्दा, विचारा हा जो शब्द सांगितला आहे तो तुमच्या प्रगतीसाठी, हिताचा आहे, त्याच्यासाठी सांगितले आहे. नाहीतर लोक पर्सनल गोष्टी विचारतात, तुमचा पगार किती आहे, तुमचे वय किती आहे,वैगेरे वैगेरे…त्यामुळे विचारताना सुद्धा शहाणपणाने विचारा. पण जिथे तुमचा अधिकार आहे जिथे तुमची प्रगती आहे, जिथे तुम्ही आडला आहे तिथे तुम्ही विचारलेच पाहिजे. जर कुठूनच उत्तर सापडत नसेल तर त्या विषयावर पुस्तके वाचा…पण जो पर्यंत समाधानकारक उत्तर भेटत नाही गप्प बसू नका. आजपासून हा शब्द तुमच्या मनामध्ये कोरून ठेवा. आम्ही ही तुम्हाला विचारतो लेख आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा..

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *