भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांचे अनेक किस्से सगळ्यांनाच माहित आहेत. अजित डोभाल आयपीएस अधिकारी असण्याच्या बरोबरीनेच एक उच्च दर्जाचे गुप्तचरही होते. ज्यांनी पाकिस्तानात वास्तव्य करून अनेक वर्ष गु प्त हे री केली व तिथून ते आवश्यक माहिती मिळवत गेले. या काळात पाकिस्तानात कोणालाच त्यांच्यावर संशय आला नाही. ते मुस्लिमांसारखे राहात होते. ते उर्दूमध्ये बोलायचे, तसेच मशिदीत जाऊन त्यांनी जमाव्यांसह नमाजचाही अभ्यास केला. जेणेकरून कोणाला त्यांच्या मुसलमान असण्यावर शंका आली नाही. महत्वाची गोष्ट अशी की शुक्रवारच्या नमाजाव्यतिरिक्त ते दररोज जाऊन एकदा नमाज पढत असत.
पाकिस्तानमध्ये राहून, त्यांनी भरपूर गुप्तचर माहिती गोळा केली. त्यांच्या पाकिस्तानच्या कारकीर्दीच्या काळात अनेकदा त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला जे अतिशय रोमांचकारक आहे. एकदा एका सार्वजनिक कार्यक्रमात एक व्यक्तीने अजित डोभाल यांना असा प्रश्न विचारला की त्यांना त्याचे उत्तर द्यावेच लागले. पण जे उत्तर दोभाल यांनी दिले ते ऐकून तिकडे उपस्थित लोकांनी पाच मिनिटे टाळ्या वाजवल्या. वास्तविक त्या व्यक्तीने असे विचारले की आपण इतके वर्षे पाकिस्तानमध्ये राहिलात, आपल्यासमोर कधी कोणते धर्मसंकट उभे राहिले होते का, किंवा आपण कधी पकडले गेलात का. त्याबरोबरच त्यांनी असेही विचारले की कधी असे काही वाटले का की ज्याने तुमचे पितळ उघडे पडेल किंवा संकटाचा प्रसंग ओढवेल.
या प्रश्नाचे उत्तर देताना अजित डोभाल यांनी सांगितले की, लाहोरमध्ये एकदा जेव्हा ते एका मशिदीत नमाज पढायला गेले तेव्हा एका व्यक्तीने त्यांना ओळखले. पांढऱ्या दाढ्यातील एक वृद्ध व्यक्तीने त्यांना आपल्याजवळ बोलावून विचारले की कडक शब्दात विचारले, “तू हिंदू आहेस, इकडे नमाज पढायला का गेलास?” अजित डोभाल हा प्रश्न ऐकून खूप आश्चर्यचकित झाले.स्वतःला सांभाळत ते त्याला म्हणाले , ये तुला सांगतो की तू कसा हिंदू आहेस.ती वृद्ध व्यक्ती त्याला मशिदीपासून थोडे पुढे असलेल्या एका खोलीत घेवून गेली. नंतर म्हणाले, तुझे कान टोचलेले आहेत, प्लास्टिक सर्जरी करून घे,असं फिरणं योग्य नाही, एक दिवस पकडला जाशील.

मग त्या व्यक्तीने अजित डोभाल यांना सांगितले की मी तुला ओळखलं कारण मी ही हिंदू आहे. नंतर म्हणाले , एकेकाळी मी ही हिंदूच होतो, पण पाकिस्तानच्या मुसलमानांनी माझे संपूर्ण कुटुंब मारले. त्यांनी अजित डोभाल यांना शिव आणि दुर्गेची लहानशी मूर्तीही दाखवली व म्हणाले की मी या मूर्त्याची पूजा करतो.हे पाहून अजित डोभाल म्हणाले ‘मी हिंदू आहे, पण तुम्ही कोण आहात?’ तेव्हा त्यांनी सांगितले की, कुटुंबाच्या मृ त्यू नं त र त्यांना न्यायतर मिळालेला नव्हता, म्हणून मी मजरावर बसू लागलो. आता लोक मला एक फकीर म्हणून ओळखतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.