कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल की, पेरुच्या पानांमुळं हे आजार मुळापासून गायब होतात….

जेव्हा फळांचा विषय निघतो, तेव्हा सफरचंद, डाळिंब, आंबा आणि द्राक्ष याबद्दल सर्वच बोलतात, परंतु, पेरूसारख्या गुणकारी फळाचा कोणीच उल्लेख करीत नाही. पेरु भारतात सहज मिळणारे फळ आहे. पेरूचे गुणधर्म खूप आहेत, पण त्याच्या पानांचे पण अनेक उपयोग आहेत, जे कितीतरी लोकांना माहीत नाहीत. आज आम्ही त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.

पेरु अनेक प्रकारचे असतात. जसे की, अलाहाबादी पेरु, लाल गर असणारा पेरु, चित्तीदार पेरु. पेरुला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावे आहेत जसे, इंग्रजी मध्ये गुआवा, बंगालीमध्ये पेयारा व मराठीमध्ये पेरू. आता जाणून घ्या, पेरू आणि त्याच्या पानांचे अनेक फायदे.

पेरु हे फळ तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तसेच ह्या फळाचा आस्वादही आपण बरेच वेळा घेतला असेल. देशभरात कोठेही मिळणारे हे फळ आणि याची पानेही तितकीच उपयोगी आहेत. खरे तर, पेरुमध्ये आर्यन भरपूर प्रमाणात असते जे आपल्या शरीरसाठी अतिशय आवश्यक आहे. आर्यनमुळे आपले शरीर लवकर थकत नाही व ऊर्जा टिकून राहते. पेरुच्या पानांचा उपयोग अनेक आजारांमध्ये केला जातो.

पेरूचे वैज्ञानिक नाव सिडियम गुआवा असे आहे. कितीतरी लोकांचे असे म्हणणे आहे, की पेरु कधीही फोडी करून खाऊ नये. जर कोणी एखादी व्यक्ति पेरु खात असेल, तर त्याला तो पूर्ण खाऊ द्यावा. असे मानले जाते, की पूर्ण पेरुमध्ये असे एक बीज आहे, जे “रोगप्रतिकारक शक्ति” वाढवते, तसेच, सर्दी व खोकला यापासून आपला बचाव करते. तसे पहिले तर, पेरुने रोगप्रतिकारक शक्ति वाढते हे बरोबर आहे, पण “पेरुच्या बी”च्याबद्दल कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

दातांसाठी उपयोगी: जर तुमचे दात दुखत असतील, किंवा दात कमजोर असतील व हिरड्यातून दुर्गंधी येत असेल, दातातून पू येत असेल, व रक्त येत असेल, तर या अशा अनेक विकारांवर पेरुच्या पानांची पेस्ट अतिशय उपयोगी आहे. जर तुम्हाला तुमच्या दातांच्या अनेक समस्या सोडवायच्या असतील, तर तुम्ही पेरुच्या पानांची पेस्ट दातावर रोज टुथपेस्ट प्रमाणे लावून दात स्वछ घासावेत. तर तुमच्या दातांच्या समस्या लवकरच संपुष्टात येतील.

गाठी येणे: पेरूची पाने ही शरीरावरील गाठीनसाठी पण अतिशय उपयोगी आहेत. पेरूची पाने कुटून त्याचा लगदा बनवून तो किंचित गरम करून, जिथे गाठ आली आहे, तिथे लावावा म्हणजे सूज कमी होते व आराम पडतो. या आजारात आहे पेरु अतिशय फायदेशीर: हृदयासाठी पेरुच्या पानांचा रस प्यायल्याने आपले हृदय स्वछ होते. याशिवाय पोटाच्या अनेक आजारामध्ये पेरुच्या पानांचा उपयोग होतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *