मोठा खुलासा : महिन्यातून 2 ते 3 वेळा सुशांतच्या घरी येत होता तांत्रिक, सुशांत वर जादू टोना करून रिया चक्रवर्ती करायची….

सुशांत आ त्म ह त्ये च्या प्रकरणात रिया चक्रवर्ती ईडीसमोर हजर होणे आणि तिच्या साडेआठ तासांच्या चौकशीचा परिणाम असा झाला आहे, की रियावरील ईडीची शंका अधिक दृढ झाली आहे. असे सांगितले जात आहे, की रियाने मात्र या तपासणीत आवश्यक सहकार्य केले नाही आणि विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे न देण्याचा व ते टाळण्याचा खूप प्रयत्न केला. याचबरोबर, बिहारमधून तपासासाठी मुंबईला गेलेली एसआयटीची टीम परत पाटण्याला रवाना झाली आहे. एसआयटी टीमने तेथील बर्‍याच लोकांची चौकशी केली आणि त्यांची निवेदने घेतली. या निवेदनातून अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत.

चौकशी दरम्यान असे समजते, की एक तांत्रिक सुशांतच्या घरी येत असे आणि पूजेबरोबरच सुशांतचा उपचार ही करीत होता. कर्मचार्‍यांनी एसआयटीला अशी माहिती दिली, की रिया चक्रवर्ती सुशांतवर तांत्रिकाकडून उपचार करून घेत होती आणि त्यासाठी तिने खूप पैसे पण घेतले सुशांतकडून. सुशांतला असे सांगितले जात होते, की तांत्रिक तुला पूजा पाठ न करता, तुझा सर्व त्रास दूर करेल. महिन्यात दोन ते तीन वेळा हा तांत्रिक सुशांतच्या घरी येत असे व त्याच्यावर उपचार करीत असे.

याशिवाय सुशांत आणि त्याच्या अभिनेत्री मैत्रिणीच्या मोबाईल क्रमांकाच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) याच्या तपासणीत अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. राजकीय आणि पोलिस प्रकरणात रिया चक्रवर्ती हिच्या घुसखोरीवर बरीच चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, असे समोर येते आहे, की पोलिस पथकाने रियाच्या कॉल डिटेल रेकॉर्डची कसून तपासणी केली असता, रियाने मुंबई पोलिसांचे डीसीपी आणि चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी वारंवार संभाषण केल्याचे समोर आले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतरसुद्धहा ती डीसीपीच्या सतत संपर्कात होती. आता हे गूढ काय आहे, ते ईडीला शोधून काढायचे आहे.

२१ जून ते १८जुलै पर्यंत रिया पोलिस अधिकार्‍यांच्या संपर्कात राहिली. दोन वेळा पोलिस अधिकार्‍याने स्वत: रियाला फोन केला आणि रियानेही त्याला दोनदा फोन केला होता. पोलिस अधिकार्‍याने रियाला एकदा मेसेज सुद्धहा पाठवला होता. मात्र, शुक्रवारी जेव्हा हा नवीन खुलासा झाला, तेव्हा पोलिस अधिकार्‍यानी आपले स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की त्यांनी सुशांत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हा फोन केला होता व त्या चौकशीसाठीच त्यांना फोन करावे लागले. लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावू नये व संशय घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *