बॉलीवुडमध्ये बघितले तर, काही असे चेहरे आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत खूप प्रसिद्धी मिळवली आहे. हे तर आपण सर्वच जाणतो, की इथे नाव मिळवणे इतके सोपे नाही. म्हणून, इथे कितीतरी लोक येतात आणि निघून जातात, काही तर आपले पूर्ण आयुष्य घालवतात, परंतु मनासारखे यश नाही मिळवू शकत. पण काही चेहरे असेही आहेत, जे एका रात्रीत ह्या फिल्मी जगतात आपले नाव कमवू शकले आहेत.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. हो, एक अशी सुंदर अभिनेत्री, जीने आपल्या पाहिल्याच फिल्मने लोकांची मने जिंकली आणि पाहिल्याच फिल्मने यशाच्या शिखरावर पोहोचली आणि प्रत्येक जण तिला ओळखू लागला. परंतु, आश्चर्याची गोष्ट ही आहे, की एतकी लोकप्रियता मिळवून सुद्धहा हळूहळू ती फिल्म इंडस्ट्री मधून गायब होत गेली. ज्या अभिनेत्रिबद्दल आपण बोलत आहोत, ती ८०च्या दशकातील टॉपची अभिनेत्री होती, आणि त्यांचे चर्चेत येण्याचे कारण हे होते, ती आपल्या पहिल्या फिल्ममध्ये बोल्ड सीन द्यायला कोणतीही तक्रार केली नव्हती. परंतु, आज एतक्या वर्षानंतर हीच अभिनेत्री अशी दिसते, की आपण तिला ओळखू नाही शकणार.
हो, आम्ही बोलत आहोत, सन १९८५ मध्ये आलेली फिल्म “राम तेरी गंगा मैली” ची अभिनेत्री यास्मीन जोसेफ उर्फ मंदाकिनीची. त्यांनी या फिल्ममध्ये गंगा हे पात्र रंगवले होते. त्या वेळी या फिल्ममध्ये मंदाकीनीच्या बरोबर राज कपूरचा सगळ्यात लहान मुलगा राजीव कपूर पण होते. ही यास्मीनची पहिली फिल्म होती आणि ती त्या वेळी खूपच हिट झाली होती. फिल्म हिट झाल्यानंतर तिच्याकडे फिल्मसच्या अनेक ऑफर्सची लाइन लागली आणि मंदाकिनी ने कितीतरी वेगळ्या फिल्ममध्ये काम केले परंतु, तिच्या पहिल्या फिल्म प्रमाणे दुसर्या कोणत्याच फिल्म झाल्या नाहीत.
प्रसिद्ध झाल्यानंतर थोड्याच दिवसात मंदाकीनी पुन्हा चर्चेत आली पण यावेळी कारण काहीतरी वेगळे होते. यावेळी मंदाकीनीचा अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमबरोबर संबंध अशा बातम्या समोर आल्या. अशा बातम्या होत्या, की मंदाकिनी दाउदची प्रेयसी, गर्लफ्रेंड आहे आणि त्यांची कितीतरी छायाचित्रे सानीर येऊ लागली. जेव्हा मंदाकिनीला या बद्दल विचारले गेले, तेव्हा तिने सांगितले, की आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. मी तर त्यांना व्यक्तीगत ओळखत नाही.
तसे तर, दाउदनेच मंदाकिनीला कितीतरी फिल्मस मध्ये आणले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मंदाकिनीने मिथुन चक्रवर्ती बरोबर ‘डांस डांस’, आदित्य पंचोली बरोबर ‘कहा है कानून’ आणि गोविंदाबरोबर ‘प्यार करके देखो’ अशा कितीतरी फिल्म्समध्ये काम केले. परंतु, वादविवादात आल्यामुळे, ती या इंडस्ट्रीपासून दूर गेली.