प्राचीन काळी राण्या राजांना आकर्षित करण्यासाठी या युक्त्यांचा वापर करत असत…आजही या युक्त्या….

आज त्वचेसाठी बाजारात कितीतरी प्रकारची क्रीम्स आणि लोशन उपलब्ध आहेत, याशिवाय पण अशा कितीतरी गोष्टी उपलब्ध आहेत, ज्या त्वचेची काळजी घेण्यासाठी जरूरी आहेत, आणि आज कितीतरी लोक यांचा वापर करतात. परंतु, तुम्ही कधी विचार केला आहे का, की पूर्वीच्या काळी जेव्हा हे सर्व नव्हते, तेव्हा राण्या आपली काळजी कशी घ्यायच्या. अशी कोणती गोष्ट होती, जिच्या वापराने त्या इतक्या सुंदर दिसायच्या, की जो कोणी त्यांना बघेल, तो त्यांच्यावर मोहित होत असे. खरे तर, पूर्वीच्या काळी राण्या आयुर्वेदाचा आधार घ्यायच्या आणि हे आयुर्वेदच त्यांच्या सौंदर्यांचे कारण होते. आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदाच्या त्या रहस्यांबद्दल सांगणार आहोत, ज्याला स्वतः राण्या वापरत असत.

राजा महाराजाच्या मदिराप्राशनाच्या छंदाबद्दल सर्वांनाच माहीती आहे. असे सांगितले जाते, की, त्या काळी राण्या दुधात अंड्यातील सफेद भाग, लिंबू व दारू हे सर्व मिसळून आपल्या चेहर्‍यावर व त्वचेवर लावित असत, त्यामुळे त्यांच्या त्वचेला तकतकी येऊन त्वचा खुलून दिसत असे आणि सुंदरता येत असे. गुलाबपाण्याच्या गुणकारी उपयोगांबद्दल आपण सर्वच जाणता. पूर्वीच्या काळी राण्या गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात घालून स्नान करीत असत आणि त्याचबरोबर गुलाबपाणी आपल्या त्वचेवर लावत असत. तुम्ही पण आपल्या चेहर्‍याला आणि शरीराच्या त्वचेला दिवसातून दोनदा गुलाबपाणी लावा, तर लवकरच तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार बनेल.

अक्रोड औषधी गुणांचे भंडार मानले जाते, याचबरोबर अक्रोड चेहर्‍यावर सुरकुत्या येऊ देत नाही. तसेच त्याच्या सेवनाने चेहर्‍यावरील सुरकुत्या लवकरच निघून जातात. पूर्वीच्या काळी राजा आणि राणी अक्रोडांचे भरपूर सेवन करीत असत, जर आपणही अक्रोडचे सेवन नियमितपणे केले, तर त्याचे परिणाम आपल्याला लवकरच दिसून येतील. आज केस गळण्याची मोठी समस्या समोर येत आहे आणि त्याचे कारण आपली अनियमित जीवनशैली आणि प्रदूषणसुद्धहा आहे, आणि याच कारणाने धुळ आणि मातीमुळे केस कमजोर होतात. यांच्या बचावासाठी वापरण्यात येणारे शैम्पू पण केसांसाठी हानिकारक सिद्ध झाले आहेत. पूर्वीच्या काळी राण्या केसांसाठी ऑलिव्ह तेल आणि मध याचा वापर करीत असत. त्याच्या वापराने, केस चमकदार, लांब, दाट आणि मजबूत होत असत.

पूर्वीच्या काळी, असे सांगितले जाते, की राण्या अत्तराचा खूप वापर करीत असत, ज्यामुळे राजा त्यांच्याकडे आकर्षित होत असे, अत्तरामुळे राण्यांची त्वचा सुगंधित आणि कोमल होत असे. प्राचीन इतिहासाच्या माहितीनुसार, राण्या दुधाने स्नान करीत असत. असे सांगितले जाते, की पूर्वीच्या काळी राण्या दुधाने स्नान करीत असत.  दूध त्वचेसाठी खूपच गुणकारी आहे. त्यामुळे त्या तरुण आणि सुंदर दिसत असत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *