लग्नाची पहिली रात्र ही सगळ्यान साठीच खुप खास असते. नवविवाहिताना हवीहवीशी वाटणारी ही रात्र एकमेकांना पुर्णपणे विलीन करून टाकते. प्रेमविवाह झालेल्यांना हा अनुभव थोडा वेगळा पहिल्यांदा ऑफिशिली एकत्र झाल्याची फिलींग तर ऍरेंज वाल्यांन साठी तर सगळ एकदम नवं च असत. चित्रा आणि माझ लग्न घरच्यानीच ठरवलं होतं. खरंतर पाहता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो आणि लग्नाचे स्वप्न रंगवायला लागलो होतो. कस असेल बर सगळंच बदलून जाईल माझंही स्वताच हक्का च कोणीतरी असेल हसायला बोलायला भांडायला आणि प्रेम करायला. या सर्वांन सोबतच पहिल्या रात्री चा विचार ही माझ्या मनात येत होता. कधी मुलींना धड चार शब्द बोलु न शकणारा मी हे ही स्वप्न बघु लागलो.
ठरलेल्या तिथी प्रमाणे आमचं लग्न पार पडल आणि मला ज्या क्षणाची उत्सुकता होती तो ही लग्नाच्या दुसर्याच रात्री आला. त्या रात्री मी खुप nervous आणि excited होतो. 11 वाजले होते माझ्या बहिणीने मला माझ्या खोलीकडे बोलवले आणि म्हणाली जा नवरदेव मॅच फत्ते करा. तिच्या अशा बोलण्याने तर मी लाजेने पार गुलाबी च झालो आणि पटकण खोलीत शिरून दरवाजा बंद केला. माझ्या खोलीत खुप सुंदर फुलांची सजावट केलेली होती, आणि चित्रा खुप सुंदर सजुन माझ्या बेड वर बसलेली होती. आजचं तिच रूपपार मला मोहुन टाकत होत. तिची ती गड्द हिरव्या रंगाची साङी आणि लाल रंगाचं ब्लाउज तिच्या गोर्या रंगावर खुप उठून आणि आकषिर्त दिसत होता. मी तर आधी तिच्याकडे बघतच राहिलो पण तिने वर बघताच मी माझे डोळे खाली वळवले, आम्ही आज एकमेकांच्या डोळ्यांत बघु शकत नव्हतो.
या सगळ्या वातावरणात मोगर्याचा सुगंध मला आणखीन च मोहुन टाकत होता. माझ्या मनाला आवर घालत मी बेड पर्यंत कसाबसा पोहोचलो. चिजा जवळ जाऊन बसलो पण ती थोडीशी घाबरलीशीच झाली. पण आता मला काही थांबवत नव्हतं मी हालुवार माझे हात तिच्या खांद्यावर ठेवले आणि तिला माझ्या स्पर्श होताक्षणीच माझ्या मनात जसा हजारो विजांचा प्रवाह चालु झाला. मी तिला जवळ घेऊन माझ नियंत्रण गमावणार च कि तेवढ्यात तिने खोलीतली मोहक शांतता भंग करत म्हणाली “ थांब ” मला काही कळेनासे झाले मी तिच्या कडे पाहिले तोच तीने माझे हात तिच्या खांद्यावरून काढत ती स्वतःला सावरू लागल आणि चक्क बेड वरून उठून ती माझ्या पासुन लांब एका खुर्चीवर बसली. मला काही कळेना माझ काही चुकलं असेल का मग मी मला आवर घालत समजुत घातली कदाचित तीला हे सगळं नविन असल्याने गोंधळी असेल.
मी तिला विचारलं काय झालं ये ना जवळ बस इकडे माझ्या. ती बोलली ” रोहित प्लिज मला थोङ बोलायचं आहे ” मी काय बोलु कळत नव्हतं मी म्हणालो ” बोल न काय झाल ” तिने बोलायला सुरुवात केली “ रोहित मला या लग्नात काही रस नाही. माझ एका मुलावर खुप प्रेम आहे मी त्याला विसरू शकत नाही आणि तुझी कधीच होऊ शकत नाही मला माफ कर घरच्यांचा नाईलाजाने मला हे लग्न कराव लागल पण मी आता तुझ्या सोबत राहु शकत नाही, उद्या सकाळी मी जाईल त्याच्या कडे ” हे सगळं ऐकताना मला काहीच कळत नव्हतं फक्त माझ्या स्वप्नाचा आणि चेहर्यावर चा रंग उडताना दिसत होता. पण मी आता काय करूहे कळत नव्हतं मी काही न बोलता कपाटातल माझ आंथरूण काढत होतो तेवढ्यात ती रडायलाच लागली मी तीला समजवत म्हणालो ” शांत हो चित्रा काळजी करू नकोस तु मला इतक विश्वासात घेऊन सगळ सांगीतलं हे बर केल तु उद्या एकटी जाऊ नको मी सोडेल तुला ती शांत झाली आणि बेड वर येवून झोपली.
मी ही माझ आंथरूण टाकून पडलो पण माझी झोप उडाली होती. मनात खुप प्रश्न होते आता काय करायचं सगळ्याना कस तोंड देणार काही कळेना शिवाय माझ पुढे काय होणार याची ही चिंता वाटत होती. पण मी चित्रा साठी खुश होतो तिला तिच प्रेम उद्या भेटणार होत. घरच्या लोकांना काही कळू नये म्हणून मी तो स्पेशल पहिल्या रात्री तयार केलेल्या हळदीच्या दुधाचा ग्लास पिला होता आणि त्याने त्याच काम चालू ही केल होत पण काही मार्ग नव्हता मी तसाच कसाबसा झोपलो .
सकाळी लवकरच मला जाग आली होती चित्रा आंघोळ करून तयार होती. मी ही काही वेळात सगळ आवरून तयार झालो पण आजचं ही तीच रूप मला तितकंच मोहत होत पण मी जास्त विचार न करता खोलीच्या बाहेर पडलो ती आत च होती. माझी ताई तिची पाठराखीण अशा चार चोघी मला बघुन हासत होत्या पण त्याना वाटत होतं तसं काही घडलेल नव्हतं हे मी त्याना सांगु शकत नव्हतो. तेव्हढ्यात ताई म्हणाली “ काय नवरदेव केव्हा जाताय बायको ला घेऊन मला काही कळेना आता यांना कस कळाल मी काही न बोलता सरळ खोलीत गेलो मी खोलीत येताच चित्राने दार बंद केलं. मी काय कराव म्हणून आरश्या सामोर गेलो तोच चित्राने मला मागून घट्ट मिठी मारली मी एकदम स्तब्ध उभा राहिलो तोच चित्रा बोलली ” काय नवरो बा कशी वाटली ऍक्टीगं भोला ग माझा नवरा ” आणि खूप खळखळून हसली मग मला लक्षात आला सगळा प्रकार हा सगळा माझी फजिती करण्याचा बेत होता तर, मी काही न बोलता माझ्या चित्राला मिठीत घेतलं आणि मग काय आम्ही आमची पहीली रात्र सकाळी साजरी केली.
– लेखन मनोरमा
मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. फोटो प्रतिकात्मक आहे आणि तुम्हाला लेख कसा वाटला ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.