ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी हे काम करतात. त्यांचे घर नेहमी धनधान्याने भरलेले राहते, त्यांना कधी, आर्थिक अडचण, भेडसावत नाही. तसे तर आपल्या शास्त्रांमध्ये अशी बरीच कामे सांगितले आहे, जी महिलांसाठीच आहेत व महिलांनीच करावीत. ही कामे केल्याने आपल्या घरात बरकत येते, व कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. महिलांनी जर हे कार्य केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होते, व सदा घरात निवास करते. काही असे उपाय असतात, जे केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यत बदलते. जर महिलांनी हे कार्य केले, तर घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते. व घरातील वातावरण शुद्ध व सकारात्मक बनते, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
काही स्त्रियांना रात्री केस मोकळे करून झोपण्याची सवय असते, परंतु यामुळे त्यांच्यावर नकारात्मक व वाईट शक्तीचा प्रभाव पडतो. म्हणून रात्री कधीही केस मोकळे करून झोपू नये,
रात्री झोपण्यापूर्वी झाडू दारामागे ठेवावा, यामुळे घरावर चोरांचे संकट राहत नाही, आपल्या घराचे चोरांपासून संरक्षण होते.
आठवड्यातून एक वेळा साधे खडे मीठ किंवा काळे मीठ प्रत्येक खोलीत थोडेथोडे कोणाला लक्षात येणार नाही अशा प्रकारे वर्तमानपत्राच्या तुकड्यांवर ठेवून द्यावे. रात्रभर ते मीठ तसेच ठेवावे, व सकाळी उठल्यानंतर अंघोळीपूर्वी हे मीठ एकत्र करून गटारीत टाकून द्यावे, या उपायामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते. व आपल्या घरात काही वाईट शक्तींचा प्रभाव असेल, वाईट बादा असेल, तर त्यांचा प्रभाव नष्ट होतो. देवी लक्ष्मी चा घरात वास होतो, घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर, ती नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते, व आपले अडलेली कामे मार्गी लागतात. व्यवसायात काही अडचणी असतील तर त्याही दूर होतात.
रात्री झोपण्यापूर्वी सर्व भांडी स्वच्छ करून किचन स्वच्छ करून मगच झोपावे, नाही तर घरात जीवजंतू चा पादूरभाव होतो. व घरात आजारपण येते उष्टी भांडी घरात रात्रभर तशीच ठेवू नये, जर कामवाली मावशी येणार असेल तर, भांडी पाण्याने विसरून मग घराबाहेर किंवा गॅलरीत ठेवावीत. रात्री झोपण्यापूर्वी स्टिंग चे पाणी जाते त्या जाळीमध्ये 1, 2 कापुराच्या वड्या टाकून ठेवाव्यात यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते,
रात्री झोपण्यापूर्वी भगवंताचे दर्शन करून नंतर झोपावे म्हणजे शांत झोप लागते व सकाळी आपण प्रसन्न मनाने उठतो.