लंकाधिपती रावण आपल्या सर्वांना परिचित आहेच. तो पुलस्त्य मुनींचा नातू व विश्रवस यांचा मुलगा होता. रावणाच्या आईचे नाव कैकसी होते. कुंभकर्ण व बिभीषण हे रावणाचे दोन भाऊ होते. रावणाचे मूळ नाव दशग्रीव असे होते. तो मोठ्या मोठयाने आरडाओरड करी म्हणून त्याला रावण हे नाव पडले. रावण हा असामान्य असा वीर होता. अनेक युद्धे त्याने जिंकली होती. देवांचाही त्याने कितीतरी वेळा पराभव केला होता. कैलास पर्वतावर जाऊन त्याने कुबेरला जिंकले होते. तो रागीट होता. एकदा क्रोधाच्या भरात त्याने इंद्रदेवाचे नंदनवन उध्वस्त केले होते.
रावण जसा पराक्रमी होता तसाच कठोर निश्चयी होता. उग्र तप करून त्याने ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतले होते. त्यासाठी त्याने आपली मस्तके अर्पण करण्यासही मागे पुढे पाहिले नाही. ब्रम्हदेवाकडून त्याला पिशाच्च, उरग, राक्षस, दैत्य, दानव व देव यांचे हातून मृत्यू येणार नाही असा वर मिळाला होता. या वरांमुळे रावण प्रबळ झाला व त्याला आपल्या शक्तीचा गर्व झाला होता. तो आपल्या प्रजेलाही त्रास देऊ लागला. पण अखेर रामाच्या हातून त्याचा मृत्यू विधिलिखित होता.
मृत्यूपूर्वी लंकाधिपती रावणाने स्त्री जातीबद्दल अशा ३ गोष्टी सांगितल्या होत्या, त्या समजल्यावर तुम्ही पण व्हाल आश्चर्यचकित:
धार्मिक शास्त्रानुसार लंकाधिपती रावण एक अशी व्यक्ति होती, ज्याने माता सीतेला रामाच्या नकळत पळवून आणून मोठी चूक केली होती. रावण एक शूर योद्धा होता. परंतु रावण मात्र भगवान रामापेक्षा सुध्हा ज्ञानी होता, म्हणूनच मृत्यूसमयी आपले प्राण त्यागण्यापूर्वी त्याने महिलांबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या की त्या गोष्टीं पडताळून पाहिल्या तर आताच्या काळात त्या सत्य असल्याचा प्रत्यय येतो आहे. आज आम्ही तुम्हाला त्या ३ गोष्टी सांगू इछितो ज्या रावणाने मृत्यूपूर्वी सांगितल्या होत्या:
रावणाने सांगितले की स्त्रिया एकमेकींची निंदा करतात, त्यांना कोणत्याही गोपनीय गोष्टीची माहिती मिळाली की त्या ती स्वत:जवळ लपवून ठेऊच शकत नाहीत आणि ती गोष्ट सगळीकडे पसरवतात. याच कारणामुळे कधीही स्त्रियांना आपल्या कोणत्याही गोपनीय गोष्टी सांगू नयेत, जर असे केले तर त्या आपल्या नाशाचे कारण ठरू शकतात.
स्त्रिया खूप जास्त मतलबी किंवा स्वार्थी असतात आणि आपला हेतु साध्य करण्यासाठी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यासाठी कोणाला फसवायला लागले तरी किंवा कोणाला जवळ करावे लागले तरी ते त्या स्वत:च्या फायद्यासाठी करतात.
रावणाने प्राण जाण्यापूर्वी स्त्रियांबद्दल तिसरी अशी गोष्ट सांगितली की, स्त्रिया आपल्या कोणत्याही वचनापासून कधीही मागे फिरू शकतात आणि त्या कधीही खरे बोलत नाहीत, याच कारणांमुळे स्त्रियांवर खूप विचार करून मगच भरवसा ठेवला पाहिजे.