लग्नाला जेमतेम ८ दिवस झालेले पत्नी माहेरी गेली, परतलीच नाही, घ्यायला गेल्यावर…..घडले असे कि….

मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, राहुल संतापाने बोलत होता, हॉल मध्ये सगळे जण गपगुमान ऐकत होते, आणि नेहा खाली मान घालून हुनके देत रडत होती. नेहाचे बाबा हात जोडून राहुलला म्हणाले, ‘जावई बापू मला माफ करा… मी तुमचा दोषी आहे, माझे संस्कारच कुठेतरी कमी पडले असणार. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसत होते. त्यांच्याकडे बघून राहुललाही वाईट वाटले, तसाही त्यांचा यामध्ये काहीच दोष न्हवता, तरी देखील मुलीच्या चुकीची शिक्षा ते भोगत होते. राहुल त्यांना म्हणाला, “नाही बाबा दोष फक्त तुमचा ऐकट्याचा नाही… कारण मुलांना तर संस्कार आई आणि वडील या दोघांकडून मिळत असतात, आणि विशेष म्हणजे मुलीच्या बाबतीत तर, मुलीच्या आईने मुलीची मैत्रीण बनून, तिच्या भावना, तिच्या समस्या, जाणून घ्यायच्या असतात आणि सोडवायला देखील मदत करायची असते.

नेहाचे तर वय अल्लड होते. या वयात मुली मुलांकडे लवकर आकर्षित होतात, मात्र अशा वेळी मुलींना योग्य मार्गदर्शन करणे ही सर्वस्वी आईची जबाबदारी असते.माझ्या मते या प्रकरणामध्ये नेहा जितकी दोषी आहे, त्यापेक्षा जास्त दोशी तुम्ही आहात सासुबाई…….! तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती असूनही तुम्ही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तुम्ही तिला योग्य मार्गदर्शन करायला हवे होते. आणि वेळ प्रसंगी ही गोष्ट तुम्ही बाबांच्या निदर्शनात आणून देणे, ही तुमची जबाबदारी होती.

असो….. आता तुम्हाला जो काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, आणि मला कळवा मी निघतो आता. राहुल जाण्यासाठी निघाला, तेवढ्यात नेहाचे बाबा हात जोडून राहुलला थांबवत म्हणाले, :थांबा जावईबापू आमची चूक निस्तरण्याची एक संधी आम्हाला द्या.’ प्लीज….. तुमच्यासारखा जावई मिळायला नशीब लागते, परंतु आमच्या मुलीला तुमची कदरच नाही याचीच आम्हाला जास्त खंत वाटते. नेहाचे बाबा नेहाकडे बघत म्हणाले, नेहा तू आता काय करायचे ठरवले आहे. नेहा रडत होती, मात्र तिच्या नजरेत अपराधीपणाचे भाव दिसत होते. नेहा म्हणाली, बाबा मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मात्र तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य असेल….. त्यावर बाबा म्हणाले, नाही…. नेहा निर्णय आता तुला घ्यायचा आहे.

जर कोणावर आपले निर्णय थोपवले तर, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची कल्पना आली आता मला…. त्यावर नेहा रडत रडत म्हणाली, बाबा मी चुकले माझी ही शेवटची चूक समजून फक्त एकदा माफ करा मला, प्लीज…. पुन्हा अशी चूक नाही होणार माझ्याकडून, आणि बाबा तुम्ही अगदी खरं बोललात, राहुल सारखा समजूतदार नवरा मिळायला, नशीब लागतं.नंतर नेहा राहुलच्या पुढे येऊन हात जोडत म्हणाली, राहुल मला माफ करा, मी स्वतःच्या सुकासाठी सर्वांचा विश्वासघात केला, मला माहित आहे माझी चूक अक्षम्य आहे, परंतु तरी देखील ती चूक सुधारण्याची एक संधी मला द्या, शेवटची चूक समजून मला माफ करा, प्लीज प्लीज…… यावेळी मला माफ करा. ‘नाही…. नेहा तू पुन्हा चूक करते मला हे सर्व मान्य नाही’ राहुल म्हणाला, राहुलचे हे वाक्य ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. नेहाचे बाबा पटकन खाली बसले, आता नेहाच्या बाबतीत नक्कीच काहीतरी अनुचित घडणार याचा अंदाज त्यांना आला होता.

नेहा राहुल कडे बघत उभी होती, कुणीतरी जोरदार कानफाडीत मारल्याचा आभास तिला झाला, तिचे डोके घरघरायला लागले व ती खाली सोप्यावर बसली. काहीवेळ सगळे शांत होतात, पुढे राहुल म्हणाला, नेहा तू प्रेम तर विपिनवर करतेस ना, मग माझ्या सोबत तू संसार करू शकते का?, हा आपला संसार सुखाचा होईल का?, विपिन ची जागा तू मला देऊ शकशील का?, तू शरीराने माझ्याजवळ आणि मनाने विपिन जवळ असशील…. याला काय अर्थ आहे तूच सांग.

म्हणून म्हणतो तू ज्याच्यावर मनापासून प्रेम करतेस त्याच्याशी संसार कर, मी आहे तुझ्याबरोबर, तू आधी विपिन ला फोन कर, आणि त्याला सांग की तुला त्याच्याशी उद्या लग्न करायचे आहे. नेहा सह सगळेजण औवाहून राहुल कडे बघत होते. नेहाचा तिच्या कानावर विश्वासच बसेना, तिच्या डोळ्यात अश्रू होते, आणि राहुल विषयी नितांत आदर असल्याने राहुलने नेहाला विपीनचा नंबर डायल करायला लावला, व इशाराने तिला फोन स्पीकर वर करायला सांगितला.

सगळ्यांचे लक्ष त्या फोनवर लागले होते. समोरून आवाज आला हा बोल नेहा, यावर नेहा म्हणाली, विपिन मला उद्या तुझ्याशी लग्न करायचे आहे, आपले लग्न लावून द्यायला सगळे तयार झाले आहेत. समोरून आवाज आला, काय नेहा…..! तू मूर्ख आहेस का?, काय बोलतेस तू अग?, तुझे आत्ताच लग्न झाले आणि विशेष म्हणजे तु चक्क बारा दिवस तुझ्या नवऱ्यासोबत राहून आली आहेस. मी कसे लग्न करणार तुझ्याशी? ते आता शक्य नाही. मला माफ कर मी तुझ्या सोबत लग्न नाही करू शकत. हे ऐकून नेहाच्या पायाखालची जमीन सरकली, ती त्याला म्हणाली विपिन अरे हे काय बोलतोस तू माझे तुझ्यावर प्रेम आहे.

हा लेख नक्की वाचा  : सुनेच्या सांगण्यावरून पोरानं बापाला घराबाहेर काढलं, पण बापाने पोराची अशी काय जिवरली की….

तुझ्यासाठी मी माझा संसार सोडून आली आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? आणि काय रे चार दिवसापासून आपण भेटत आहोत ना मग ते काय आहे?, त्यावर विपिन म्हणाला, नेहा मी तुला भेटायला येत नाही, तू मला बोलवते म्हणून मी येतो. सहज तुझा टाईमपास व्हावा म्हणून याचा अर्थ असा नाही की, मी तुझ्याशी लग्न करेन. अंग तुझे लग्न झाले आहे तू तुझ्या नवऱ्यासोबत चक्क राहून आली आहेस. सॉरी मला माफ कर आणि फोन कट झाला, नेहा सोबत तिच्या घरच्या सर्वांनाच धक्का बसला, तिचा तिच्या कानावर विश्वास बसेना नेहा शॉक झाली होती.

ज्याच्यावर आपण इतके दिवस मनापासून प्रेम केले, ज्याच्यासाठी आपण सगळ्यांना सोडायला तयार झालो, त्यांनी एका क्षणात आपल्याला सोडले….. प्रेमभंगाचे दुःख तिच्या डोळ्यात अश्रूंच्या रूपात दाटले होते. त्यांना ती वाट मोकळी करून देत होते, सगळं संपल्यागत तिची अवस्था झाली होती. हा सगळा प्रकार नेहाचे बाबा बघत होते, आणि विशेष म्हणजे विपीन च्या तावडीतून नेहाची सुटका झाल्याचा आनंद त्यांचा नजरेतून स्पष्ट दिसत होता. परंतु पुढे काय होणार ही अनामिक भीती सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

ते उठले आणि राहुलला हात जोडत म्हणाले, जावईबाबू नेहासाठी तुम्ही योग्य जोडीदार आहात, मी तुमच्या पाया पडतो…. राहुल ने त्यांचे हात हातात धरले, तेवढ्यात नेहाने येऊन राहुलचे पाय पकडले, आणि म्हणाली राहुल मला माफ करा…. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी प्रेमामध्ये आंधळी झाली होती, स्वार्थी झाले होते, प्रेमासाठी मी सर्वांना सोडायला तयार झाले होते, ते प्रेम नव्हते तर ते फक्त शारीरिक आकर्षण होते. यामुळे माझ्यासारख्या बर्‍याच मुली या मोहजाळ्यामध्ये अडकतात आणि स्वतःचे आयुष्य उध्वस्त करतात. माझ्याही बाबतीत तेच घडलं राहुल प्लीज यावेळी मला माफ करा. भविष्यात अशी चूक माझ्या कडून कधीच घडणार नाही.

तिच्या डोळ्यातील पश्चातापाचा अश्रूने त्याचे पाय भिजले होते, राहुलने तिला उठवले आणि मिठीत घेतले राहुलच्या मिठीत ती मनसोक्त रडली, नंतर काही वेळाने राहुल म्हणाला मग आता आपण निघायचे का ? आपल्या गावाला? नेहाने राहुल कडे बघत मान डोलवली आणि मी पॅकिंग करते म्हणत आत निघून गेली. नेहा च्या आईला आपली चूक कळली होती. तिने हात जोडून सर्वांची माफी मागितली, आणि आत मध्ये डोळे पुसत  निघून गेली. थोड्यावेळाने बॅग घेऊन नेहा बाहेर आली, बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी दोघेही वाकले त्यांना जवळ घेतले, त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले सुखी रहा आणि त्यांच्या डोळ्यातून आनंद आश्रू वाहू लागले.

आज खऱ्या अर्थाने ती सासरी चालली होती, सर्वांचा निरोप घेत दोघेही निघाले. घरी आल्यावर ऐका सुनीची जबाबदारी तिने योग्यरीतीने पार पाडली, जेवण वैगरे आटोपले आणि नेहा बेडरूममध्ये शिरली, राहुल तिची वाट बघत होता, नव्या नवरीसारखी ति लाजत त्याच्या मिठीत शिरली. लांबलेली मधुचंद्राची ती रात्र दोघांच्या प्रणय मधून नाहून निघत होती.

हा लेख नक्की वाचा  : सुनेच्या सांगण्यावरून पोरानं बापाला घराबाहेर काढलं, पण बापाने पोराची अशी काय जिवरली की….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *