एका गावात एक शेतकरी राहत होता. तो आपल्या शेतात खूप कष्ट करत असे. त्याच्या कुटुंबात पत्नी, मुलगी आणि एक मुलगा राहत असे. शेती बरीच असल्यामुळे कष्ट करण्यासाठी त्यांच्याकडे 5-6 बैल होते. त्यांपैकी पांढऱ्या रंगाची जोडी त्याला खूप आवडायची. बैलजोडी दिसायला खूपच सुंदर होती. शेतीतले कामे पण ही जोडी खूप करत असे. तसा तो शेतकरी सर्वच जोडींवर प्रेम करायचा, सर्वांची चांगल्या प्रकारे सोय करायचा. पावसाळा सुरू झाला, पेरणीचे दिवस आले, सगळीकडे कामाची लगभग सुरू झाली. त्या शेतकऱ्यांने ही पेरणीला सुरवात केली.
ऐके दिवशी त्या शेतकऱ्याने पेरणीला त्याच्या आवडत्या जोडीला जुंपले. दिवसभर ती पण चालली. 4 वाजता शेतकऱ्यांच्या मुलाचा फोन आला. “बाबा मी आज 6 वाजता रेल्वे स्टेशन वर येणार आहे. आज मला घ्यायला या. आता वेळ कमी होता. शेतकऱ्याने शेती पण सोडली. आणि मुलाचा फोन आला होता म्हणून त्या गड्याला सांगितलं. अरे बाबा! आपली पांढरी बैल जोडी गाडीला जुप आणि आपल्याला स्टेशनवर जायचं आहे. लगेच गड्याने पांढरी बैल जोडी गाडीला जुंपली.आणि ते मुलाला घेण्यासाठी स्टेशनवर गेले. मुलाला घेऊन घरी येई पर्यंत रात्रीचे 8 वाजले होते. घरी आल्यानंतर गड्याने बैलजोडी गोट्यात बांधली. त्यांना चारा टाकला आणि घरी निघून गेला.
शेतकरी जेवण करून झोपी गेला. रात्रीचे बारा वाजून गेले होते. सर्वजण झोपी गेले होते. शेतकऱ्यांच्या मुलीच्या पोटात कळा(वेदना) यायला सुरू झाल्या. ती काही दिवसांपूर्वीच बाळंतपणा साठी माहेरी आली होतो. आता शेजारच्या गावातील दवाखान्यात घेऊन जाणार. शेतकऱ्यांने आपल्या गड्याला आवाज दिला. त्याला सगळं सांगितलं. गड्याने पांढरी बैलजोडी गाडीला जुंपली. कारण तीच जोराने पळत होती. बैलांनी कमी वेळात दवाखान्यात पोहचवल. बैलगाडी दवाखान्याच्या बाहेर सोडली.
“त्या पांढऱ्या बैल जोडीतील एक बैल दुसऱ्या बैलाला म्हणतो, काय रे या शेतकऱ्याकडे 6 बैले आहेत.आणि आपल्यालाच हा शेतकरी का जुंपतो. मुलाला आणायला आपल्यालाच सांगतो, आणि शेवटी एवढ्या रात्री दवाखान्यातही आपल्यालाच घेऊन येतो. बाकीच्या बैलांना तो काहीच काम सांगत नाही. ते मस्त मज्या करतात. इतक्यात शेतकरी हसऱ्या चेहऱ्याने बाहेर आला. बैला च्या पाठीवर हात फिरवला. आणि त्यांच्या पाया पडला.आणि म्हणाला बाबांनो तुम्ही माझ्यावर फार उपकार केलं. तुम्ही आज नसता तर मुलगीच काय, तर तीच होणार बाळ ही जिवंत नसत. त्याने बैलांना मनोमन धन्यवाद दिले. आता मात्र त्या बोलणाऱ्या बैलाला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. आणि त्यात त्या दोघांचा दिवसभरातील क्षीण निघून गेला होता. मित्रानो काम त्यालाच मिळत जो प्रामाणिक पणे काम करतो. आपण ही कायम म्हणत असतो मीच का ? तर याच उत्तर ही हेच आहे.
मित्रांनो अश्याच सुंदर माहितीसाठी, Marathi Asmita पेज नक्की लाईक करा…. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.