तुमच्या घरामध्ये फ्रिज असेल तर ‘हे’ तुम्हाला माहित असायलाच हवे नाहीतर…

आजकालच्या या यंत्र युगात आपल्या जीवनात यंत्र किंवा उपकरणे यांचा वापर इतका जास्त झाला आहे, की आपणास जास्त काम करण्याची जरूर पडत नाही जास्तीत जास्त कामे यंत्रानेच होतात. हल्लीच्या दिवसात सर्वांच्या घरात शीत कपाट (फ्रीज) तर जरूर असते आणि आपण याचा वापर खाण्याच्या वस्तु ठेवण्यासाठी करतो कारण त्यामुळे त्या वस्तु ताज्या राहू शकतील आणि जंतुमुक्त राहू शकतील. शीत कपाट किंवा फ्रिज हे हल्ली प्रत्येक मध्यमवर्ग परिवाराची आवश्यकता बनली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात याचे महत्व अजूनच वाढते.

थंड पाणी, सरबत बनवण्यासाठी, आइस क्रीम बनवण्यासाठी, दूध नासण्यापासून वाचवण्यासाठी, जेवण सुरक्षित व ताजे राहावे यासाठी याचा खूप उपयोग होतो. योग्य देखभालीशिवाय फ्रीज सारखी किमती व आवश्यक उपकरण लवकरच खराब होऊ शकते आणि बर्‍याच अडचणी येऊ शकतात. याचा योग्य उपयोग होण्यासाठी त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे त्यामुळे ही उपकरणे जास्त काळासाठी आपल्या उपयोगी पडतील व लवकर खराब होणार नाहीत. यासाठी आपल्याला खाली दिलेल्या काही खास गोष्टीकडे लक्ष देणे जरूरी आहे.

सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की फ्रीजला नेहमी समपातळीत ठेवावे ज्यामुळे तो हलणार नाही. त्यामुळे त्याचा कोमप्रेसर चांगल्या पद्धतीने कार्य करेल व त्यावर अतिरिक्त भार पडणार नाही.

आपल्या फ्रीजला भिंतीलगत ठेवू नका. त्याला नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी.

फ्रीजला कधीही गरम जागी ठेऊ नका. जर तो स्वैयंपाकघरात ठेवण्याची आवश्यकता असेल तर चुलीपासून किमान पाच फुट अंतरावर ठेवावा. फ्रीजमध्ये खाण्यापिण्याच्या गरम वस्तु ठेवू नका. गरम वस्तु असेल तर ती थंड करून मगच फ्रीजमध्ये ठेवा. याचप्रमाणे फ्रिजमधून काढलेले सामान लगेच गरम करून नका. त्याला प्रथम सामान्य तापमानला येऊ द्या व मगच गरम करा.

फ्रीज चालू असताना दरवाजा जास्त वेळ उघडा ठेऊ नका. त्यामुळे फ्रीजच्या आतील तापमान वाढते व त्यामुळे परत थंड होण्यासाठी जास्त वीज वापरली जाते. फ्रीजला पटकन उघडता कामा नये. यामुळे फ्रीजचा बल्ब खराब होऊ शकतो व दरवाजाच्या चौकटीला असलेला रबर पण खराब होतो.

याचे लक्ष देणे पण आवश्यक आहे फ्रिजरच्या बाहेरील आवरणावर बर्फ जमा होता कामा नये. जर बर्फ जमलाच तर तो विरघळवून टाकावा. जमलेला बर्फ कधीही सूरी अथवा कोणत्याही टोकदार वस्तूने खरवडण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे फ्रीज खराब होऊ शकतो. फ्रीजचे तापमान एकदम कमी किंवा जास्त ठेऊ नये परंतु हळू हळू कमी जास्त केले पाहिजे. जर फ्रीज थंड होत नसेल तर समजावे की कोम्प्रेसरचा गॅस निघून गेला आहे. मग चांगल्या मेकॅनिकला दाखवले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *