असे तर लोक खूप सुधारमतवादी झाले आहेत परंतु तुम्ही पाहिले असेल की आजही कितीतरी ठिकाणी महिला आपल्या पतीचे नाव घेत नाहीत. त्या आपल्या पतीला हाक मारण्यासाठी “जी” किंवा “अहो”या शब्दाचा उपयोग करतात. खरे तर, बदलत्या काळानुसार सर्व काही बदलले आहे. २१वे शतक चालू आहे व मुलींनी आपल्या नवर्याला त्यांच्या नावाने हाक मारायला सुरुवात केली आहे. जर प्रेम विवाह असेल तर मुली आपल्या नवर्याला खुशाल नावाने हाक मारतात. पण लग्न घरच्या लोकांनी ठरवून केलेले असेल, तर मात्र नवर्याना त्यांच्या नावाने हाक मारायला काही मुली गोंधळतात. पण तुम्ही कधी या गोष्टीवर लक्ष दिले आहे का की आजच्या काळात सुद्धा काही महिला आपल्या पतीचे नाव का घेत नाहीत? या मागचे कारण जाणून घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला असेल. पण आम्ही आपल्याला सांगू इछितो की असे विनाकारण होत नाही. असेच महिला आपल्या पतीचे नाव घ्यायला घाबरत नाहीत. त्यामागे पण काही अनोखे धार्मिक कारण आहे. आजच्या या लेखात आम्ही त्याच कारणाबद्दल सांगू इछितो. आम्ही तुम्हाला सांगतो की का अजूनही काही महिला आपल्या पतीचे नाव घ्यायला घाबरतात किंवा टाळतात॰
यासाठीच नवर्याचे नाव नाही घेत महिला :
महर्षि वेदव्यासाना देवाचा अवतार मानले गेले आहे. त्यांच्या मुखातून निघालेले उद्गार भगवान गणेशांनी स्कंद पुराणात लिहिले आहेत. स्कंद पुराणात लिहिले आहे की ज्या घरात पतिव्रता स्त्री चे आगमन होते, त्या घरात राहणार्या लोकांचे जीवन आनंदाने भरून जाते. आता तुम्हाला सांगतो की महिला का आपल्या पतीचे नाव घेत नाहीत. खरे म्हणजे, स्कंद पुराणात लिहिले आहे की पतीला नावाने हाक मारल्याने त्यांचे आयुष्य कमी होते.
म्हणूनच पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी महिला कधीही त्यांना त्यांच्या नावाने बोलवत माहीत. या शिवाय स्कंद पुरूणात असेही लिहिले आहे की, त्याच महिला पतिव्रता म्हणून ओळखल्या जातात, ज्या पतीच्या भोजनांनंतरच स्वत: हा भोजन करतात. असेही म्हटले गेले आहे की ज्या महिला आपला पती झोपल्यानंतर स्वत: झोपतात, व पती उठण्यापूर्वी स्वत: उठतात, त्यांनाच पतिव्रता स्त्रीचा दर्जा दिला जातो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की पतिव्रता स्त्रीने श्रृंगार करू नये जर काही कारणाने तिचा पती तिच्यापासून दूर राहत असेल. एवढेच नाही तर एका पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीच्या परवानगीशिवाय कोणत्याही तीर्थस्थान किंवा उत्सवात सहभागी होता कामा नये.
परंतु, आजकालच्या आधुनिक मुली या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. त्या स्वत:ला पुरुषांपेक्षा कमी समजत नाहीत, जे अगदी योग्य आहे. आम्ही स्कंद पुराणातील विचारांचा विरोध करत नाही ,परंतु कोणत्याही सर्वसाधारण माणसाला देवाचा दर्जा देणे योग्य नाही. जो पुरुष महिलेला सन्मानाने वागवत नाही व त्यांना स्वत:पेक्षा कमी लेखतो, खरे तर असा पुरुष कोणत्याही मान-सन्मानाच्या योग्य नाही.