लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने केले असे काम की, सर्वांचेच होशच उडले…

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मध्ये आज एक जरासा विचित्र प्रसंग समोर आला आहे. लोक विशेषतः मुलाची आई व वडील मंनापासून आपल्या मुलाच्या लग्नाची व नवीन सून घरात आणायची स्वप्ने पाहतात. पण सगळ्यांनाच याचा चांगला अनुभव येत नाही. आता हेच बघा. मुरादाबाद येथे घडलेली घटना. या बाबतीत वधू अशी निघाली की वर पक्षाला पश्चाताप करण्याची वेळ आली. असे ही बोलले जात आहे की हे लग्न सुद्धहा नातेवाईकांनी कोणा मध्यस्थाच्या मार्फत पैसे देऊन जमवले होते. नीट चौकशी न करता लग्न जमवले तर त्याचे काय परिणाम होतात ते बघा.

लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी वधुने पूर्ण परिवाराला बेशुद्ध करून दागदागिने व रोकड रक्कम घेऊन पलायन केले. शेजारी राहणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार पोलिसांनी परिवारातील पाच लोकांना जे नशेच्या अमलाखाली होते, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, जेथे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. आता पोलिसांनी गुन्हा नोंदवून आणि त्याच्या तपासणी कामात व्यस्त आहेत.

इथल्या सिविल लाइन झांजरपूर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात राहणारा संजय हॉटेल मध्ये काम करीत होता. गेल्या 2 ऑगस्टला संजयचे बरेलीत राहणार्‍या पूजा बरोबर वाजत गाजत लग्न झाले होते. नव वधूच्या येण्याने घरात खुशीचे वातावरण होते. सगळ्यांच्या आग्रहावरून शनिवारी रात्री नवरीने सगळ्यांना जेवण करून वाढले.

तिने जेवणात काय घातले माहीत नाही पण परिवरातील सर्व मंडळी घरात झोपूनच राहिली आणि लुटारू नववधु ने घरातील रोख रक्कम व दागदागिने घेऊन पलायन केले. शेजारीच राहणारा प्रदीप जो या परिवाराचा जवळचा नातलग म्हणजेच नात्याने भाऊ लागतो तो जेव्हा घरी आला तेव्हा सगळे बेशुद्ध पडलेले दिसले. त्याला आश्चर्य वाटले. त्याने तत्काल पोलिसात वर्दी दिली. पोलिसांनी सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले व त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

थोडा नशेचा अम्मल कमी झाल्यावर घरातील लोक शुद्धीवर आले तेव्हा नव वधुने घरातून पलायन केले होते व सोळा हजार रोख रक्कम व दागदागिने गायब झाले होते. लगेचच पोलिसात तक्रार नोंदवली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *