आचार्य चाणक्यनी अशा नीतीमुल्यांचा उल्लेख केला आहे त्याचे जर आपण अनुकरण केले तर आपले जीवनच बदलून जाईल. त्यांनी जीवनाविषयी अनेक मूल्यांचे निर्माण केले आहे, व ती मूल्ये खूपच लोकप्रिय आहेत. त्यांनी चाणक्यनीति मध्ये अश्या जीवन मूल्यांचा उल्लेख केला आहे ज्याचे आपण अनुकरण केले तर कोणाचेही जीवन आमुलाग्र बदलू शकेल. विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावाने प्रसिद्ध असलेल्या नामांकित चाणक्य नीती मध्ये धन आणि लक्ष्मी यांच्या पसंतीच्या जागेच्या बद्दल उल्लेख केलेला आहे.
अर्थशास्त्राचे महान विद्वान आचार्य चाणक्यनि मानवी जीवन सोपे करण्यासाठी कितीतरी नीतीमूल्ये निर्माण केली. त्याला प्रसिद्धीही मिळाली. विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावाने प्रसिद्ध असलेल्या नामांकित चाणक्य नीती मध्ये धन आणि लक्ष्मी यांच्या पसंतीच्या जागेच्या बद्दल उल्लेख केलेला आहे.
आपल्या चाणक्य नीतीच्या तिसर्या अध्यायात त्यांनी असा उल्लेख केला आहे की लक्ष्मीदेवी कशा प्रकारच्या घरात राहणे पसंत करते. लक्ष्मी अशा घरात राहणे पसंत नाही करत ज्या घरात मूर्ख व्यक्तींचा आदर व सन्मान केला जातो. चाणक्य म्हणतात असे लोक जे परिस्थिती न बघता बोलतात, ज्यांचे विचार नकारात्मक असतात व जे कारण नसताना वाद घालतात , ते लोक मूर्ख असतात. असे लोक ज्या घरात असतात तिथे लक्ष्मी देवी निवास करत नाही.
अनेक वर्षे गेली तरी हुशार राजनीति जाणणारे आचार्य चाणक्य यांची नीतीमूल्ये प्रासंगिक आहेत. जीवन मूल्यांवर आधारित कितीतरी गोष्टी त्यांच्या “ चाणक्य नीतिशास्त्र” या ग्रंथात आहेत. त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की त्या जर माणसाने नाही केल्या तर त्याचे जीवन अर्थहीन आहे.
धर्म: चाणक्य म्हणतात माणूस चांगल्या कर्माने धर्म संचय करतो व त्याचा जन्म सफल होतो. त्यांच्या मते धर्म आचरणात आणून धन प्राप्त केले पाहिजे व मग त्याचा उपभोग घेतला पाहिजे. काम: मानवी जीवनात कर्माला सर्वाधिक मानले गेले आहे. चाणक्य म्हणतात मनुष्याने कर्म करूनच मोक्ष प्राप्ती करावी. ते म्हणतात माणसाने आपल्या कामाची इच्छा पूर्ती केली पाहिजे , विवाह केला पाहिजे, संतती जन्माला घातली पाहिजे. या शिवाय मनुष्याचे जीवन सफल होते असे मानले जात नाही.
धन: धन कमावणे व त्याचा योग्य रीतीने उपभोग घेणे हे माणसाच्या सफलतेसाठी आवश्यक आहे. चाणक्य नीतिनुसार ज्याला धन कमावता नाही आले त्याचा जन्म व्यर्थ आहे. या शिवाय चाणक्य म्हणतात की ज्या घरात अन्नाचा किंवा धान्याचा आदर केला जातो तेथे लक्ष्मीचे वास्तव्य असते. चाणक्य म्हणतात की ज्या घरात धान्याची चांगली भरभराट असते ते घर लक्ष्मीदेवीला प्रिय असते.
पति पत्नि यांचे आपसातले भांडण लक्ष्मीला पसंत नाही. ज्या घरात घरातील महिलेचा आदर केला जात नाही, तिथे लक्ष्मी निवास करत नाही. जे पति पत्नि प्रेम, त्याग याबरोबर एकमेकांचा आदर करतात तिथे लक्ष्मी स्वतः हून येते. तसेच, ज्या घरात भांडणे आहेत अशा घरांपासून लक्ष्मी दूर राहते.