भारतीय दूरदर्शनवर अनेक धारावाहिक मालिकांचे संचलन होते. रोज नवीन नवीन मालिका येतात व आपण त्या थोड्या कालावधी नंतर विसरून जातो. या मालिकांमध्ये जास्त करून सासू सुनांच्या बाबत मालिका चालतात. घरातील महिला त्या मन लावून बघत असतात. एकूण हाती आलेल्या माहितीनुसार बघितले तर कौटुंबिकसंबंधा व्यतिरिक्त हास्य मालिका आता कमीच आहेत. पण गेल्या 8 ते 10 वर्षापासून आपल्याला हसवणारी एक अतिशय उत्तम मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही भारतातील एक नंबरवर असलेली हास्य धारावाहिक मालिका ठरली आहे.
या मालिकेतील प्रत्येक पात्राला आपण चांगलेच ओळखत असाल तरीही आजच्या या लेखात आम्ही आपणाला विशेष करून जेठालाल या पात्राचा परिचय करून देणार आहोत. ज्याने थोड्याच कलावधीत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. अजूनही ही मालिका यश्स्वीरीत्या चालू आहे.
50 वर्षाच्या जेठालाल यांची भूमिका सर्वमान्य दिलीप जोशी हे अभिनेते करत आले आहेत. ते तारक मेहता या मालिकेचे प्रमुख पात्र आहेत. जणूकाही या मालिकेचे ते सर्वेसर्वा आहेत. दिलीप जोशी हे गेले 25 ते 30 वर्षे बॉलीवूड क्षेत्रामध्ये व्यस्त आहेत परंतु त्यांना तारक मेहता या मालिकेने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवून दिली असे त्यांचे वैयक्तिक मत आहे. दिलीप जोशी ह्यांनी सलमान खान बरोबर ‘हम आपके है कौन’ या सिनेमात अत्यंत उत्तम असे काम केले आहे.
आता जाणून घेऊया थोडेफार त्यांच्या कुटुंबियांबद्दल. दिलीप जोशी यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे लग्न झाले असून ते दोन मुलांचे वडील आहेत. ते आपणास बर्याच बक्षीस वितरण सोहळ्यात आपल्या कुटुंबासोबत दिसतात. जोशी यांची बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एक मान्यवर अभिनेता अशी ओळख आहे. त्यांच्या संपत्तीबाबत बोलायचे झाले तर त्याचे मूल्यमापन केले असता त्यांची एकूण संपत्ति 40 कोटी पेक्षा जास्त आहे. जोशी प्रत्येक दिवशी एक ते सव्वा लाख पेक्षा जास्त मानधन घेतात.
आपणास सांगतो की दिलीप जोशी हे सर्वात जास्त करून जेठालाल या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी मालिकांमध्ये याच नावाने आपली ओळख निर्माण केली आहे. संपत्तीबरोबरच त्यांचा एक मोठा बंगला आहे तसेच ते ऑडी Mercedes तसेच वेगवेगळ्या आरामदायी व भारी किमतीच्या गाड्यांचे मालक आहेत.
मित्रानो तारक मेहताच्या शो मध्ये आपल्याला जेठा लाल ही भूमिका कशी वाटते, त्यांनी ही भूमिका अगदी जीव ओतून केली आहे व तितकीच ती लोकांना भावली आहे. ते म्हणतात या मालिकेने मला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले.