पहिल्या आणि दुसर्‍या मुलाच्या जन्मामध्ये किती अंतर असायला हवे, जाणून घ्या

कितीतरी वेळा तुम्ही गर्भधारणा विचारपूर्वक व नियोजन करून करता तर काही वेळेस ते नकळत होऊन जाते. अशावेळी बर्‍याच लोकांच्या मनात हा प्रश्न पडलेला असतो की दोन मुलांच्या जन्मामध्ये बरोबर किती अंतर असणे जरूरी आहे. तुमच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही इथे जाणून घ्या.

कितीतरी वेळा पहिले मूल जन्माला येते की दुसर्‍या दिवशीपासून घरातील माणसे दुसर्‍या मुलाची चर्चा करायला सुरुवात करतात. तर काही वेळेस पालक कित्येक वर्ष याचा विचारही करत नाहीत. तसे तर दुसरे मूल हवे आहे की नाही याचा निर्णय पालक स्वतः घेतात. पण बर्‍याच वेळा स्त्रिया कळत नकळत दुसर्‍या वेळेस गरोदर राहतात. अशा वेळेस हा प्रश्न पडतो की दोन मुलांमधील वयात अंतर किती असावे? कोणतीही स्त्री जीने आताच मुलाला जन्म दिला आहे, तिचे शरीर दुसर्‍या गर्भधारणेसाठी परत कधी तयार होईल? दोन्ही मुलांची काळजी, त्यांना मिळणारा आहार, आणि आईच्या शरीराची ठेवण यावर दोन मुलांमध्ये किती अंतर असावे? जर तुमच्या मनात हे सर्व प्रश्न असतील तर त्याची उत्तरे इथे जाणून घ्या॰

6 महिन्याच्या अंतराने दुसर्‍यांदा गरोदर राहण्यात असलेला धोका:

ज्या महिला 30 व्या वर्षी पहिल्या मुलाला जन्म देतात, त्यांच्याकडे एवढा अवधि नसतो की त्या आपल्या दोन मुलांमध्ये चांगले अंतर ठेवू शकतात, कारण त्यांच्यासाठी त्यांचे वाढते वय गर्भधारनेशी संबंधित समस्या उत्पन्न करू लागलेले असते. म्हणून स्वास्थयाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कोणीही महिला जोपर्यंत एक गर्भधारणा व प्रसूती पासून पुर्णपणे बाहेर पडत नाही तोपर्यंत तिने दुसर्‍या मुलाचा विचार करू नये. विशेष करून जेव्हा तिच्या शरीरात लोह आणि हिमोग्लोबिंनचि कमतरता असते. बर्‍याच अभ्यासानंतर असे सिद्ध झाले आहे की पहिल्या प्रसूतीच्या 6 महिन्याच्या आत जर ती महिला पुन्हा गरोदर राहिली तर अशा मुलाचे वजन जन्माच्या वेळी कमी असते व लवकर प्रसूती होण्याचा धोका संभवतो.

18 महीन्यापासून ते 23 महिन्यापर्यंत अंतर असणे जरूरी आहे:

अशा वेळी दोन गरोदरपणातील अंतर 18 ते 23 महीने म्हणजेच दीड ते दोन वर्ष अत्यंत जरुरीचे आहे. हे अशा कारणासाठी की गरोदरपणा व प्रसूतीच्या नंतर महिलेच्या शरीराची झीज भरून याला एवढा कालावधी लागतोच. एवढेच नाही तर दोन मुलांच्या मधील अंतर ठेवणे यासाठी पण जरूरी आहे की आपण आपल्या दोन्ही मुलांकडे योग्य लक्षं देऊन त्यांचे व्यवस्थित पालनपोषण करू शकू. जर दोन मुलांमधील वयाचे अंतर योग्य असेल तर आपण दोन्ही मुलांच्या सुरवातीच्या वयात त्यांच्यावर योग्य लक्ष ठेवू शकतो व मुलांवर होणार्‍या खर्चाचे व्यवस्थापन करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *