बॉलीवुड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचा पहिलाच चित्रपट अतिशय यशस्वी झाला. त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या. पण मधुच्या बाबतीत असे घडले नाही. पहिला चित्रपट यशस्वी झाल्यानंतर सुद्धा ती अभिनेत्री प्रकाशझोता बाहेर गेली. त्यापैकि एक अभिनेत्री आहे मधु जीने अजय देवगण बरोबर ‘फूल और काटे’ या चित्रपटातून नव्याने पदार्पण केले होते. हा चित्रपट्स लोकांकडून अधिक पसंतीची पावती मिळाली. चित्रपटची कमाई सुद्धा कोटीच्या घरात झाली, परंतु थोड्याच अवधीत मधु चित्रपट व्यवसायातून बाहेर पडली. त्याचे कोडे सर्वांनाच पडले. लोकांना अतिशय आश्चर्य या गोष्टीचे वाटले इतक्या यशानंतर ती बाहेर का पडली.
पण तिची बाकी भाषामधील कारकीर्द चालू होती. आताच मधुने आपला 51 वा जन्मदिवस साजरा केला. तुमच्या माहितीसाठी नमूद करीत आहे की मधुचे संपूर्ण नाव मधुबाला रघुनाथ असे आहे, जीने हिन्दी चित्रपट व्यतिरिक्त तामिळ, मल्याळम, तेलगू आणि कन्नड अशा चित्रपटात कामे केली आहेत. तिथेही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ती एक गुणी अभिनेत्री आहे. तशीच माणूस म्हणून पण अत्यंत शिस्तप्रिय आहे. मधु ही हेमा मालिनीची भाची आणि जुही चावलाची वहिनी आहे. मधुला किती तरी वेळा हेमा मालिनीच्या घरी येता जाताना पहाण्यात आले आहे.
मधुने काही निवडक चित्रपटात कामे केली आहेत. तिने चांगले व तिच्या अभिरुचिला मानवतील असेच चित्रपट स्वीकारले. म्हणूनच तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीत सर्व मिळून 50 चित्रपट केले. मधु 1999 मध्ये आनंद शाह यांच्याशी लग्न केले जे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. मग तिने घरात अधिक लक्ष द्यायचे ठरवून लग्नानंतर चित्रपट संन्यास घेतला. परंतु काही काळानंतर तिने विचारही केला नव्हता अशी एक गोष्ट तिच्या आयुष्यात घडली ती अशी की त्या लव्ह यू मिस्टर आणि टेल मी ओ खुदा या सारख्या चित्रपटात पुन्हा पदार्पण करतील.
मधुने एका मुलाखतीत असे सांगितले होते की चित्रपट ‘लव्ह यू मिस्टर’ यातून तिने अल्पशी विश्रांति घेतली होती कारण तिची मुले लहान होती आणि तिला त्यांच्यावर लक्ष ठेवणे अधिक जरुरीचे वाटत होते. त्या काळात मुलांना तिची जास्त गरज होती. त्यांच्यावर तिने आपले पूर्ण लक्षं केन्द्रित केले. या चित्रपटानंतर तिची अशी अपेक्षा व इच्छा होती की ती परत निरंतर काम सुरू करेल परंतु तसे होऊ शकले नाही. मधुला दोन मुली आहेत. नंतर दीर्घ कालावधी नंतर मधुने 2017 मध्ये आठ वर्षांच्या टीव्ही वर पुनरागमन केले. लोकांनी तिचे स्वागतच केले. कारण एके काळची ती उत्तम अभिनेत्री होती.