धर्म व कूटनीती पठण करणारे आचार्य चाणक्य यांनी विवाहासंबंधी त्यांचे खोल विचार सगळ्या जगासमोर ठेवले आहेत. आचार्यांचे म्हणणे असे होते की विवाह हा जीवनाचा एक महत्वाचा घटक आहे. विवाहानंतर पती पत्नी आणि त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलते. आणि म्हणूनच लग्न कोणाशी करावे याबाबत सावधपणे निर्णय घेणे आवशयक ठरते.
आजच्या काळात पुरुष विवाहासाठी सुंदर स्त्रियांना अधिक महत्व देतात. सुंदर स्त्रिया सर्वगुण संपन्न असतील असे नाही. म्हणून कोणत्या प्रकारच्या मुलीशी लग्न करायचे आणि कोणत्या प्रकारच्या नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. पाहूया आचार्यांनी आणखी कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्यांचे हे मानणे होते की समजूतदार आणि श्रेष्ठ मनुष्य तोच असतो जो उच्चकुळात म्हणजे संस्कारी कुटुंबात जन्म घेतलेल्या संस्कारी मुलीशी विवाह करतो. अशा कुळातली मुलगी जर दिसायला कुरूप असेल तरी चालेल पण तिच्याशी रंगरूप न पाहता विवाह केला पाहीजे. कारण कन्येचे गुण हे परीवाराला वाढवतात.
पुरुषाने कधीही लग्न करताना स्त्रीच्या बाह्य सौदर्याला महत्व देऊ नये. मुलीच्या मनाच्या सौंदर्याला तसेच संस्कारांना जास्त महत्व दिले गेले पाहिजे. जर एखादी सुंदर कन्या संस्कारी , धार्मिक नसेल किंवा तिचे चारित्र्य ठीक नसेल तर कोणत्याही परिस्थितीत तिच्याशी लग्न करू नये, हा निर्णय योग्य ठरणार नाही. याउलट जर एखादी कन्या कुरूप असेल पण मनाचे सौंदर्य असेल आणि उत्तम संस्कार तिच्यावर असतील तर तिच्याशी लग्न करायला काहीच हरकत नाही. असा विवाह शुभ असतो.
आचार्य चाणक्य यांची ही नीती पुरुषांवर अगदी याचप्रकारे लागू होते. ज्या पुरुषांमध्ये असे अवगुण असतील, भलेही दिसायला सुंदर असतील, त्यांच्याशी कधीही विवाह करू नये, या उलट एखादा पुरुष जर दिसायला कुरूप असेल पण त्याच्यावर उत्तम संस्कार असतील तर त्यांचे रंगरूप बाजूला ठेवून त्याच्याशी विवाह करावा. फक्त बाह्य सौदर्य पाहून कोणतेही लग्न करू नये. कारण एखाद्या सुंदर दिसणाऱ्या स्त्रीचे मन काळे असू शकते. चाणक्यांच्या मते लालची स्त्रीशी कधीही विवाह करू नये तसेच धन आणि दागिने यांच्यात मोह असलेल्या स्त्रीशी लग्न करू नये कारण तिला योग्य अयोग्य मधला फरक कळत नसतो.
विवाह करण्याआधी ह्या गोष्टी जर नीट लक्षात ठेवल्या तर नक्की जीवन सुखाचे होईल.