आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला खूप महत्व दिले गेले आहे हमखास प्रत्येकाच्या घरी आपल्याकडे तुळशीचे रोप लावलेले सापडते. तुळशीला ‘हर्ब क्वीन’ किंवा ‘औषधाची राणी’ असं संबोधलं जातं. भारत देशामध्ये तर तुळशीला साक्षात ईश्वराचा दर्जा देण्यात आला आहे. आपण नेहमीच आपल्या आजीआजोबांकडून तुळशीच्या गुणांबाबत ऐकत आलो आहे. पण तुळशीच्या गुणांबद्दल माहीत असूनही आपण तिचा उपयोग हवा तेवढा करत नाही.
तुळशीची पाने खूप पवित्र मानली जातात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात. अनेक पूजापाठ करताना तुळशीची पाने नेहमी वापरली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का कि या व्यतिरिक्तही तुळशीचे अनेक फायदे आहेत ते ? अनेक समस्यांवर तुळस आपल्याला मदत करू शकते मग ती पैशांची समस्या असो किंवा वास्तूची. तुळशीची फक्त पाचच पाने याचे उत्तर देऊ शकतात.
जर तुम्हाला घरात नकारात्मक शक्ती आहेत असे वाटत असेल तर झोपण्यापूर्वी तुमच्या उशीखाली तुळशीची पाच पाने ठेवून द्या. यांमुळे नकारात्मक शक्ती निघून जाऊन सकारात्मक शक्ती येतील. ज्या जोडप्यांत नीट पटत नसेल किंवा ज्यांच्यात रोजच भांडणे होत असतील त्यांनी स्वतःजवळ तुळशीची पाने बाळगावीत. याने तुमच्यात भांडणे होणार नाहीत आणि नातेसंबंध सुधारतील.
ज्या ठिकाणी तुम्ही ही पाने ठेवत आहात त्यांना दर चोवीस तासांनी बदला आणि असे सलग २१ दिवस करा. सुकलेली पाने वाहत्या पाण्यात विसर्जित करा.
तुळशीच्या पाच पानांना एका लाल कागदात लपेटून पूजेच्या ठिकाणी ठेवून द्या आणि त्याची पूजा नियमित करा. ते करताना या पानांना आपल्या मनातली इच्छा सांगा . काही दिवसातच तुम्हाला उत्तम फरक जाणवू लागेल. असे केल्याने तुमचे नशीब उघडेल.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.