बॉडीगार्ड हे प्रत्येक सेलिब्रिटीच्या आयुष्यात एक खूप महत्वाची भूमिका पार पाडतात, कारण गर्दीच्या ठिकाणी ते या लोकांची काळजी घेतात आणि सुरक्षाही देतात. दीपिका पादुकोणचे बॉडीगार्ड जलाल यांच्याबद्दल बोलायचे झाले तर अनेक वर्षे ते तिच्याबरोबर आहेत आणि त्यांचे काम चोख बजावत आहेत. अनेक महत्वाच्या प्रसंगी त्यांना दीपिकाच्या बरोबर पाहिले गेले आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नादरम्यान जलाल वधूपक्षाचे नेतृत्व करत होते/ दीपिका त्यांना आपला भाऊ मानते आणि प्रत्येक रक्षाबंधनाला राखीही बांधते. एक सेलिब्रिटी असूनही तिचे हे वागणे खूप कौतुकास्पद आहे.
जलाल यांची तिच्या सुरक्षेत खूपच महत्वाची भूमिका आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की त्याचे वार्षिक वेतन काय असेल? लावू शकता तुम्ही अंदाज ? जर तुम्हाला ही रक्कम कळली तर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. एका बातमीनुसार २०१७ साली जलाल याचे वेतन वर्षाला ८० लाख इतके होते, म्हणजेच जवळपास एक करोड रुपये इतके. त्यांचे कामही तितकेच जबाबदारीचे आहे यांत काही शंकाच नाही. प्रत्येक प्रसंगी सेलिब्रिटीचे रक्षण करणे हे त्यांचे महत्वाचे आव्हान असते.
वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास दीपिका पादुकोण ला कबीर खान याचा चित्रपट ’83’ मध्ये पुढच्या काळात पाहिले जाईल ज्यात मुख्य भूमिकेत तिचा पती रणवीर सिंह सुद्धा आहे. अभिनेत्री बद्दल बोलताना निर्देशक कबीर खान यांनी सांगितले की तिचे पिता प्रकाश पादुकोण एक स्पोर्ट्स सुपरस्टार होते ज्यामुळे ती खूपच प्रभावित झाली आणि तिनेही हेच क्षेत्र निवडले. तिला खूप आवड होतीच अभिनयाची पण त्याचबरोबर तिला उत्तम अभिनय करताही येतो.
दीपिकाला ही भूमिका खूप आवडली आणि म्हणून या चित्रपटात काम करायला ती तयार झाली. निर्देशक कबीर खान यांनी जेव्हा मुख्य कहाणी तिला ऐकवली तेव्हा त्यांना हे माहिती होते की ती एक लहान भूमिका होती. म्हणून त्यांनी तिला सांगितले की तुला जर ही कथा आवडली तर ती बोर्डवर ये अन्यथा येऊ नको. तिने पूर्ण कहाणी ऐकली, तिला हे माहिती होते कि ते टीम, आणि मुले व कपिल यांबाबत आहे. तिला स्क्रीप्ट फार आवडले आणि ती बोर्डवर आली.