मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, चाणक्य म्हणतात की या सहा लोकांना तुम्ही तुमच्या घरामध्ये कदापि येऊ देऊ नका. आम्हाला माहीत आहे की आपण अशा एका सभ्य समाजामध्ये राहत आहोत की जिथे आपण लोकांना आपल्या घरात येण्यापासून आडवू शकत नाही. मात्र हे जे सहा लोक आहेत ते जर आपल्या घरामध्ये आले तर या लोकांचा जो वाईट प्रभाव आहे, तो केवळ तुमच्यावर न्हवे तर तुमच्या कुटुंबातील तुमच्या पत्नीवर, तुमच्या बहिणीवर, तुमच्या भावावर, तुमच्या लहान लहान मुलांवर सुद्धा त्याचा वाईट प्रभाव पडू शकतो, आणि त्यामुळे तुमची मनशांती ढळू शकते. आणि म्हणून या सहा प्रकारच्या लोकांना आपल्या घरामध्ये कधीही येऊ देऊ नका. तर चला ते कोणते लोक आहेत ते जाणून घेऊ.
त्यातील पहिला प्रकार दुतोंडी लोक…… म्हणजेच असे लोक जे तोंडावर गोड बोलतील मात्र पाठीमागे तुमची निंदा करतील किंवा तुमच्याबद्दल वाईट बोलतील, असे लोक अत्यंत धोकादायक आणि हानिकारक असतात. अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा, हे लोक तुमच्या कुटुंबामध्ये फूट देखील पाडू शकतात.
दुसरा प्रकार आहे चरित्रहीन असणारे लोक….. तुम्हाला जर असे वाटत असले की यांच्यापासून आपल्याला काही धोका नाही, तरी सुद्धा हे लोक अप्रत्यक्ष रित्या तुम्हाला मोठी हानी मोठे नुकसान पोहोचवू शकतात. या लोकांना समाजात अजिबात मान नसतो आणि म्हणून जर असे लोक तुमच्या घरी येऊ लागले तर तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा देखील समाजामध्ये खलावू लागते. म्हणून अशा चरित्रहीन लोकांना तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करू देऊ नका.
तिसरा प्रकार आहे नीच लोक…… नीच म्हणजे असे लोक जे अविद्यावाण आहेत ज्यांनी विद्या ग्रहण केलेली नाही आणि ज्यांचे राहणीमान समाजाला अनुरूप नाहीये व जे समाजाच्या नियमांचे पालन करत नाहीत. असले लोक कधीही आपल्या घरी येता कामा नयेत, असे लोक आपल्या घरी येण्याने त्यांचा नकारात्मक परिणाम आपल्या घरावर आणि कुटुंबातील व्यक्तींवर पडू शकतो.
चौथा प्रकार आहे दृष्ट व्यक्ती….. अशा व्यक्ती दृष्ट प्रकारचे काम करतात, चोरी करतात, गुंडागर्दी करतात, एखाद्याला धमकवण्याचे काम करतात, अशा व्यक्ती मानव कुळासाठी, मानव जातीसाठी अहितकारी असतात. आणि म्हणून विशेषतः आपल्या मुलांना अशा लोकांपासून दूर ठेवा. या लोकांची सावली देखील आपल्या बाळांवर पडू देऊ नका.
पाचवा प्रकार आहे सातत्याने त्रास देणाऱ्या व्यक्ती….. आपल्या जवळपास अशा व्यक्ती असतातच की ज्या आपल्याला सातत्याने त्रास देतात तर या व्यक्तींना देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करीकरू देऊ नका कारण तुमच्या सोबतच तुमच्या कुटुंबाला सुद्धा या व्यक्ती त्रास देऊ शकतात.
आणि सहावी व्यक्ती म्हणजे आपल्या व्यंगावर बोट ठेवणाऱ्या व्यक्ती…. या व्यक्तींची योग्यता काहीही नसते, तरी मात्र या व्यक्ती तुमच्या व्यंगावर अचुक बोट ठेवतात आणि त्यामुळे तुम्ही भडकत आणि तुमची एकाग्रता भंग होते व तुमच्या कामामध्ये सतत अडथळे येत राहतात आणि म्हणून या लोकांपासून शक्य तितके लांब राहावे आणि त्यांना घरामध्ये देखील प्रवेश करू देऊ नये.
मित्रांनो आपल्या कुटुंबाच्या प्रगती साठी आपण या सहा प्रकारच्या लोकांना अजिबात आपल्या घरामध्ये प्रवेश करू देऊ नये. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.