जे लोक हिरवी मिरची खाऊ शकत नाहीत ते लोक शिमला मिरची किंवा जिला आपण भोपळी मिरची म्हणतो तिची भाजी पाहून खूप खुश होतात. जास्तकरून या मिरचीचा वापर नूडल्स, मंचूरियन, पास्ता यांसारख्या पदार्थात चव वाढवण्यासाठी केला जातो. हे ऐकून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल की शिमला मिरची खाउन तुम्हाला लठ्ठपणापासून सुटका करून घेता येईल. बरेच आहारतज्ज्ञ या भाजीचा समावेश रोजच्या जेवणात करण्याचा सल्ला देत असतात.
वास्तविक शिमला मिरचीत विटामिन सी, विटामिन ए व बीटा कैरोटीन यांसारखे पोषक तत्व असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यात खूप मदत करतात. मग चला आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शिमला मिरचीमुळे होणार्या अद्भुत फायद्यांबाबत…
लठ्ठपणा कमी करण्यासाठी : शिमला मिरची वजन कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त मदत करते. वास्तविक शिमला मिरचीत कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते आणि म्हणूनच याच्या सेवनाने वजन वाढण्याचा धोका टाळतो. याचबरोबर ही मिरची चयापचय क्रिया सुधारते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते : याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मेंदूला आणखी तेजस्वी बनवण्यासाठी या मिरचीचा खूप उपयोग होतो. याचबरोबर ताणतणाव कमी करण्यातही या शिमला मिरचीचे खूप मोठे योगदान आहे.
पोषणाने युक्त, भोपळी मिरची : या मिरचीत पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात जसे की विटामिन ए, विटामिन सी, फलेवानाइॅड्स, अल्कालॉइड्स व टैनिन्स. यांमुळे तुमचे आरोग्य उत्तम राहाते.
कैंसर पासून वाचवते : कैंसरसारख्या गंभीर आजारांपासून शिमला मिरची आपल्याला वाचवते. याच्या नियमित सेवनाने तुमच्या शरीरात कैंसर सेल्स विकसित होत नाहीत.
विशेषज्ञ असेही सांगतात की रोज याचे सेवन केल्याने तुम्ही अशा भयंकर आजारांपासून दूर राहाल.
पोटाच्या विकारांपासून दूर ठेवते : ही भाजी खाल्याने तुमचे पोट साफ राहील आणि कोणतेही पोटाचे विकार तुम्हाला होणार नाहीत. याने तुमचे पचन सुधारेल आणि पचनाशी संबंधित कोणतेही विकार तुम्हाला होणार नाहीत.
शिमला मिरची किंवा भोपळी मिरची ही एक अशी भाजी आहे जी खूप गुणकारी आहे आणि चवीलाही उत्तम असते. याचा वापर जेवणात तुम्ही नियमित करत गेलात तर नक्की तुमचे आरोग्य उत्तम राहील यांत काहीच शंका नाही.