जर तुम्ही १५-३५ या वयोगटातले असाल तर हे नक्की वाचा नाहीतर नंतर पश्चात्ताप करायची वेळ येईल.

वय वर्षे १५-३५ म्हणजे युवा पिढी. हल्लीची ही पिढी खूप स्वतंत्र आहे आणि आपल्या विचारांनी जगते. बर्याचदा यांचे वागणे थोडे मनस्वी किंवा मनमानीचेही असू शकते. बर्याचदा एखादी गोष्ट न विचार करता हे लोक करतात ज्याने आयुष्यभर पश्चात्ताप करायची वेळ येऊ शकते. अविचाराने जर काही चूक झाली तर त्याचा पुढे खूप त्रास भोगावा लागतो. आज आम्ही या पोस्टमध्ये हे सांगणार आहोत की युवा पिढी साधारणपणे कोणत्या चुका सहज करते आणि त्या कशा टाळता येतील ते…

दुसर्यांना सतत इम्प्रेस करायला जाणे हे हल्ली खूपच सामान्य झाले आहे. आज अगदी कमी वयातली मुलेही मुलीना इम्प्रेस करण्यासाठी काय काय करतात. या भानगडीत काही मोठ्या चुका हातून घडू शकतात. या भानगडीत भरकटत जाणे, खूप जास्त पैसे खर्च करणे अशा गोष्टी होऊ शकतात, म्हणून काळजी घेणे खूप आवश्यक आहे.
बरेचदा पैश्यांचा देखावा करण्यासाठी खूप जास्त पैसे खर्च केले जातात आणि जर खूप खर्च झाला तर नंतर चणचण भासू शकते.

उशीर झाल्यावर पश्चात्ताप करूनही काही फायदा नसतो. म्हणून वेळेत सावध होणे फार आवश्यक असते. बरेचदा हातात पैसे खेळतात म्हणून नवीन पिढीतले लोक उगाच खर्च करतात किंवा अनावश्यक वस्तूही खरेदी करतात. पाण्यासारखा पैसा खर्च करून पुढे अशी वेळ येऊ शकते ज्यात काही मोठी गरज असेल तर ती भागवायला पैसे नसतात कारण सगळे पैसे विचार न करता आधीच खर्च करून झालेले असतात.

१५-३५ वयातल्या मुलींना आजही खूप पैसे कमवायची इच्छा असते. या भानगडीत ते अशा लोकांच्या किंवा कंपनीच्या संपर्कात येतात जे त्यांना संपूर्णपणे फसवून बरबाद करतात आणि नंतर पश्चात्ताप करून काहीच उपयोग नसतो कारण वेळ निघून गेलेली असते आणि उशीर झालेला असतो. आज अशा अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत ज्या गोड गोड बोलून गग्राहकांना नुसते फसवतच नाहीत तर पूर्णपणे लुटून मगच सोडतात.

हल्लीचा काळ असा आहे कि अगदी लहान लहान मुलांच्या हातातसुद्धा स्मार्टफोन असतो. याचा गैरवापर केला जाऊ शकतो.लहान वयातील मुले हल्ली जास्तीत जास्त वेळ सोशल मिडीया वर असतात आणि याचा वापर धोकादायक ठरू शकतो. फसवणूक होण्यची शक्यता असते. सतत सोशल मीडियावर राहणारी ही लहान मुले कुठेतरी आपल्या रोजच्या जीवनापासून, माणसांपासून थोडी अलिप्त राहू लागतात. यातून काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात आणि ज्यांची जाणीव होते खरी पण तेव्हा वेळ खरंच हातातून निघून गेलेली असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *