आरोग्याला एक नाही तर अनेक फायदे देणारा जांभूळ खाल, तर आजारी पडणंच विसरून जाल!

जांभूळ खूपच फायदेशीर आहे ज्याच्या सेवनाने बरेचसे रोग बरे होतात. जांभूळ खूप सार्‍या रोगांना मिनिटात दूर करते आणि हे फळ मधुमेही रोग्यांसाठी खूप गुणकारी आहे असे मानले जाते व ते खरे आहे. जांभळामध्ये खूप प्रकारचे खनिज पदार्थ असतात जे शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात. जांभळामध्ये आयर्न, विटामिन आणि फाईबर जास्त प्रमाणात असतात व या तिन्ही गोष्टी शरिरासाठी खूपच उपयोगी आहेत. जांभूळ खाणे खूपच जरुरीचे आहे आणि ते खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

जांभूळ खाण्याचे काही अनोखे फायदे : पोटाच्या तक्रारी न होता पोट एकदम ठिक: फाईबरयुक्त वस्तु पोटासाठी खूपच चांगल्या मानल्या जातात व जांभळामध्ये फाईबर जास्त प्रमाणात व उत्तम प्रकारे असते. ज्या लोकांना अपचन,गॅस या सारख्या पचनसंस्थेशी निगडीत तक्रारी असतात अशा लोकांनी रोज जांभूळ खाल्ले पाहिजे किवा जांभूळाचा रस नियमित घेतला पाहिजे.

श्वासदुर्गंधी वर गुणकारी व तोंडाला येणार्‍या दुर्गंधी पासून सुटका : जांभळाच्या पानाने जर दंतमंजन केले तर तोंडाची दुर्गंधी दूर होते. यासाठी ज्या लोकांची तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या आहे त्यांनी दिवसातून दोनदा जांभळाच्या पानाने दात घासावेत.

मधुमेहाला नियंत्रित ठेवतो: जांभूळ हे फळ मधुमेही लोकांसाठी खूपच फायदेशीर आहे व ह्याच्या सेवनाने मधुमेह नियंत्रित राहू शकतो. जांभळामध्ये अल्काएड असते जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

रक्तदाबात अतिशय फायदेशीर : रक्तदाब असलेल्या लोकांसाठी जांभूळ अतिशय उपयुक्त मानले जाते व ते खाण्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणून जे लोक रक्तदाबाने पिडीत आहेत त्यांनी जांभळाचे सेवन करणे जरुरीचे आहे.

रक्तशुद्धीसाठी गुणकारी: जांभळाच्या फळाचे नियमित सेवन केल्याने रक्तशुद्धी होण्यास मदत होते तसेच त्वचेला उजळपणा येऊन रंग उजळतो व शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.

शरीराला विषारी द्रव्यापासून मुक्त करते जांभूळ : जांभूळ खाण्याने शरीराला अनेक फायदे होतात त्यातील एक म्हणजे शरीर डिटोक्सीफाईड होते व शरीरातील विषारी व नको असलेली द्रव्य शरीराबाहेर टाकली जातात.

पोटदुखीपासून व अपचंनापासून मिळतो आराम: पोटदुखी किंवा अपचन झाले तर जांभूळ मिठासोबत खा किवा त्याचा रस मीठ घालून घेतला तर आपल्या पोटाला आराम पडतो व पोट एकदम ठीक होते.

जांभूळ खाताना या गोष्टींची मात्र जरूर काळजी घ्या:
• जांभूळाचे सेवन रिकाम्या पोटी कधीही करू नये.
• जांभूळाचा रस कधीही दूध पिण्याच्या अगोदर किवा दूध प्यायल्या नंतर लगेच घेऊ नये कारण असे केल्याने पोट बिघडू शकते किंवा ओकारी येऊ शकते.
• जांभूळ खाल्यावर लगेच पाणी पिऊ नये कमीत कमी अर्धा तासानंतर पाणी प्यावे.
• दही खाल्यानंतर जांभूळ खाऊ नये.

अशी काळजी घेऊन जर जांभूळाचे सेवन केले तर या सारखे फायदेशीर फळ नाही.

One Comment on “आरोग्याला एक नाही तर अनेक फायदे देणारा जांभूळ खाल, तर आजारी पडणंच विसरून जाल!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *