चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले. खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. खजूर हे अंत्यत पौष्टिक खाद्य आहे. खजूर खाल्याने अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. यामुळे शरीराला ताकद मिळते तसेच शरिराचा लवकर विकास होतो. आज आपण खजूरबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
१. पोटाच्या समस्या दूर होतात : खजूर खाल्य्याने पोटाच्या सगळ्या समस्या दूर होतात जसे कि अपचन किंवा बद्धकोष्ठता. रोज सकाळी नियमाने पाच खजूर खाल्ल्याने तुमचे पोटही साफ राहील. याने पोटाची आतडी स्वच्छ होतात. ज्या लोकांना गाठींचा त्रास होत असेल त्यांनी दुधात खजूर भिजवून मग तो खावा म्हणजे त्यांना खूप फायदा होईल. जर दुधात आवडत नसेल तर तुपात घालूनही तुम्ही खजूर खाऊ शकता. २. शक्ती मिळते : याने शक्ती मिळते. शरीरात लोहाचे प्रमाण वाढल्याने अशक्तपणा याने दूर होतो. याने शरीराला ओलावा मिळतो तसेच डीहायड्रेशन पासून मुक्ती मिळते. जे अशक्त आहेत त्यांनी दिवसातून चार ते पाच खजूर खावेत. यांत मोठ्या प्रमाणात ग्लुकोज फ्रुक्तोज असतात ज्याने शरीरात नवीन उर्जा तयार होते.
३. मुलांसाठी उत्तम : खजूर लहान मुलांसाठी उत्तम आहे. तांदुळाच्या पाण्याबरोबर वाटून लहान मुलांना खायला घातल्याने त्यांचा विकास होईल आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढीस लागेल. ज्यांच्या मुलांचा विकास समाधानकारक होत नसेल त्यांनी खजूर द्यायला हरकत नाही. ४. रक्ताची कमतरता भरून काढते : तुमच्या शरीरातील लोह आणि रक्ताची कमी खजूर भरून काढते. ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे त्यांनी एकवीस दिवस रोज खजुराचे सेवन करावे. आवडत असल्यास तुपाशी खजूर खाऊ शकता. यांमुळे शरीरात हिमोग्लोबीनही वाढेल.
५. लोह वाढवते : शरीरात लोह वाढवण्याचे काम खजूर करते. गरोदर स्त्रियांनीही याचे सेवन केल्यास फायदा होतो. याने शक्तीही वाढते. ६. थकवा घालवते : ज्या लोकांना थकवा येतो, सतत मरगळ आणि आळस येतो त्यांनी नाकी खजूर खावा. याने तुम्हाला नक्कीच उत्साही वाटेल. ७. हाडांसाठी उत्तम : खजूर हाडांसाठी उत्तम असून याने हाडे बळकट होतात. ज्याची हाडे कमजोर आहेत त्यांनी खजूर खाल्ला पाहिजे.
८. अन्नपचन : खजूर खाल्ल्याने शरीरातील पचनसंस्था सुधारते आणि पोटाचे विकार दूर होतात. ९. मेंदूचा विकास : याने मेंदूचा उत्तम विकास होतो आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलांनाही रोज खजूर देऊ शकता. १०. लोह वाढवते : शरीरातील लोह खजूर वाढवते आणि म्हणून ज्यांच्या शरीरात लोहाची कमी आहे विशेषतः स्त्रियांनी रोजच याचे सेवन करणे आवशयक आहे.
खजूर हा चवीला गोड असतो आणि याचे फायदे खूप आहेत. म्हणून रोज खजूर खा आणि उत्तम आरोग्य मिळवा.