तुम्हालाही माहिती नसतील जेवल्यानंतर बडीशेप खाण्याचे हे खास ६ फायदे ….

बडीशेपला सर्व मसाल्यांचा राजा म्हटलं जातं, भारतातील बहुतांश लोक जेवण झाल्यानंतर बडीशेप खान पसंद करतात. अनेक जणांना तर बडीशेप शिवाय जेवण झाल्यासारखेच वाटत नाही. बडीशेपमूळे पचन सुधारण्यास मदत होते, सोबतच तोंडाला येणारी दुर्गंधी देखील कमी होते. बडीशेप मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करू शकतात. कदाचित आपल्याला माहीत नसेल, मात्र जे लोक नियमित बडीशेपचे सेवन करतात. त्यांच आरोग्य आणि रोग प्रतिकार शक्ती बडीशेप न खाणाऱ्या व्यक्तीपेक्षा किती तरी पटीने अधिक असते, हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे.

बडीशेप ही केवळ स्वयंपाक घरातील एक मसाला नाही, यामध्ये कॅल्शिअम, सोडिअम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशिअम यासारखे तत्व आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. बदाम आणि बडीशेप एकत्र वाटून, दररोज जेवणानंतर त्याचे एक चमचा सेवन केल्यास स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे वाढते. तर मित्रानो आज आपण बडीशेप चे असेच फायदे पाहणार आहोत.

१) बडीशेप खाण्याचा सर्वात मोठा फायदा आहे, तो म्हणजे तुमच्या त्वचेच्या तक्रारी दूर होतात. दररोज बडीशेप खाल्यास आपल्या आरोग्याला चांगला फायदा होतो, आपल्या चेहऱ्यावर जर पीपल्स, मुरुम येत असतील, तर हे मुरुम देखील दूर होऊ शकतात. २) शरीरातील हार्मोन्सची पातळी चांगली ठेवण्यासाठी, तसेच त्वचा थंड ठेवण्यासाठी झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियम हे घटक उपयोगी असतात. नेमके हेच घटक बडीशेप मध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळेच आपल्या शरीरातील हार्मोनची पातळी चांगली राहते. तसेच पिंपल्स पासून देखील आपला बचाव होतो. ३) रक्ताचे शुद्धीकरण होण्यास मदत, बडीशेप मध्ये विशिष्ट प्रकारचे तैलीय घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी ही बडीशेप मोठी उपयोगी ठरते. रक्त शुद्धीकरणाचे काम फार चांगल्याप्रकारे होते.

४) चौथा फायदा तो म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी, डोळ्याचे जर आरोग्य जर चांगले राखायचे असेल, जर सुंदर डोळे हवे असतील, तर आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन A, अमिनो ऍसिड आणि अँटीऑक्सिडेंट हे घटक असायला हवेत. मित्रांनो या बडीशेप मध्ये हे तीनही घटक अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणूनच जे लोक बडीशेपच सेवन करतात, त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यही चांगलं राहतं. ५) अपचन, गॅसेस म्हणजेच ॲसिडिटीच्या तक्रारींवर उपयुक्‍त, बडीशेप मध्ये जे घटक आहेत, हे घटक आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि त्यामुळेच बडीशेप खाल्ल्यामुळं आपण खाल्लेल्या अन्नाच चांगल्या प्रकारे पचन होतं आणि परिणामी आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत नाही.

६) शेवटचा एक फायदा आहे तो म्हणजे आपल्या हृदयाशी निगडित तक्रारी..  आजकाल हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे खूप वाढलं आहे. हार्ट अटॅक येण्यामागे एक प्रमुख कारण आहे, आपल्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढने. मित्रांनो बडीशेप जर आपण रोज खाल्ली तर आपल्या हृदयाशी निगडित जे आजार आहेत, ते दूर होण्यास मदत होऊ शकते. बडीशेपमध्ये पोटॅशिअम नावाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या पोटॅशिअममुळेच आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो, हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल आणि म्हणूनच तर बडीशेप जर आपलं दररोज खाल्ली, तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. परिणामी हृदय रोग, हार्ट अटॅक येण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होते.

मित्रानो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा…आणि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून नक्की कळवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *