लॉकडाऊनमध्येही कोट्यवधींची कमाई करत आहेत बॉलीवूडचे हे सितारे, कमाईची पद्धत जाणून तुम्ही ही व्हाल थक्क!

मित्रांनो आज आपल्या देशात कोरोंना प्रसार होवू नये यासाठी लॉकडाउन सरकारकडून जाहीर केला गेला त्याचबरोबर सर्व कामधंदे, कारखाने, दुकाने, बंद झाले व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आणि लोकांना घरीच रहा असे सांगण्यात आले. परंतु ज्या वेळी लोकांची कामे बंद पडली, मजूर बेकार झाले, रेल्वे बंद झाली त्यावेळी सिनेजगताचे बरेच तारे तारका आजही करोडो रुपयाची कमाई करीत आहेत. याचे मुख्य कारण आहे सोशल मीडिया आणि त्यावर कार्यरत असलेले त्यांचे करोडोच्या संख्येने असलेले चाहते म्हणजेच फॉलोवर्स.

आज सोशल मीडियाने या लोकांना संधीच उपलब्ध करून दिली आहे. त्याचा उत्तम फायदा सिनेजगत घेत आहे. आपल्या माहितीसाठी नमूद करतो की अभिनेता ऋतिक रोशन ने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर लॉकडाउन सुरू झाल्यानंतर लगेच एक विडियो टाकला, ज्यात तो पियानो वाजवताना दिसतो आहे. विडिओ मध्ये त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी 21 दिवसाचे चैलेंज घेण्याची गोष्ट केली आहे. ते म्हणतात त्यांनी लॉकडाउन च्या 21 दिवसात पियानो शिकण्याचे चैलेंज घेतले आहे. ते लोकांना आवाहन करतात की तुम्ही पण या 21 दिवसात काहीतरी नविन शिकू शकता. आता हा विडियो बघणार्‍याना असे वाटले असेल की ऋतिकने खरच पियानो शिकायचे चैलेंज घेतले असेल व तो शिकतही असेल. पण तसे अजिबात नाहीये.

तुम्हाला माहीत असू दे की ऋतिकने ‘‘वेदांतु’ नावाच्या एका अॅप्लिकेशन चा प्रचार केला आहे. फक्त ऋतिक रोशनने नाही तर टेनिस स्टार सानीया मिर्झा, क्रिकेटर शिखर धवन आणि टिक टॉक स्टार जन्नत जुबेर यांचाही यात समावेश आहे. सोशल मीडिया वर या सर्व लोकांचे करोडो च्या संख्येने चाहते आहेत आणि या संख्यांना दाखवूनच या लोकांनी या 21 दिवसाच्या चैलेंजच्या बदल्यात मोठी मिळकत केली.

तुम्हाला माहीत असेल की प्रत्येक सेलिब्रिटीला सोशल मीडिया वर कोणतेही पोस्ट टाकल्यावर लाखो करोडो रुपये मिळतात. प्रत्येक पोस्टच्या हिशेबाने मिळणार्‍या रुपयांची संख्या त्यांच्या चाहते आणि देशात असलेली त्यांची लोकप्रियता यानुसार कमी अधिक होते. ऋतिक रोशनचे इंस्टाग्रामवर दीड करोड पेक्षा जास्त आणि ट्विटर वर पण जवळजवळ दीड करोड चाहते आहेत. एवढे फॉलोवर्स असलेल्या कोणत्याही सेलिब्रिटीला एक पोस्ट टाकण्याचे एक करोड ते तीन करोड रुपयांपर्यंत सहज मिळू शकतात.

या दोघांपेक्षा पुढे आहे टिकटॉक स्टार जन्नत जुबेर. जन्नतचे इंस्टाग्रामवर दीड करोडच्यापेक्षा जास्त चाहते आहेत. म्हणजे तुम्हाला समजले असेल ना कशी होते घरी बसून प्रसिद्ध लोकांची कमाई.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *