कोरोना वायरसच्या संक्रमणाची भीती लोकांत अगदी नीटपणे दिसून येत आहे, या वायरसची दहशत लोकांच्या मनात अशा प्रकारे बसली आहे ज्याचा अंदाज लावणे कठीण आहे, या महामारीमुळे लोक खूप काळजीतत आहेत, या वायरसच्या महामारीने लोकांचे जीवन अगदी बदलून टाकले आहे. लोकांचे राहाणे , खाणे पिणे आणि एकंदर दिनचर्या यांत बरेच बदल झालेले दिसत आहेत. ह्या वायरसचा संसर्ग कमी होण्यासाठी देशभरात लॉकडाउनचे आवाहन केले गेले आहे, यांत लोकांच्या घरातून बाहेर पडण्यावर बंदी घातली गेली आहे, काही नियम आणि अटी लागू केल्या गेल्या आहेत, ज्यांचे पालन करणे अनिवार्य आहे.
या सगळ्यात लॉकडाउनचे वातावरण आणि कोरोनाच्या संक्रमणाच्या भीतीने अनेक लोकांची लग्ने लांबणीवर पडली आहेत. जरी लोक लॉकडाऊन मुळे त्रस्त असले तरी लोकांमधील एकीचा हा अर्थ होतो की लोक कोरोनाशी लढायला पूर्णपणे सज्ज आहेत आणि ते सरकार आणि प्रशासनाला संपूर्ण सहयोग देत आहेत. याच दरम्यान एका आगळ्यावेगळ्या लग्नाची कहाणी समोर आली आहे ज्यात वधू वर लग्नानंतर घरी किंवा देवळात न जाता थेट हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणी करण्यास गेले आहेत. वर त्याच्या वधूला माप ओलांडायला घरी नव्हे तर थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.
ही घटना आहे हरियाणामधील. हरियाणामधील सिरसा जिल्ह्यात असलेल्या नागरिक हॉस्पिटलमध्ये अचानक एक फुलांनी सजवलेली गाडी येते आणि जिला पाहून सगळे थक्क होतात. सगळ्यांना हा प्रश्न पडतो की हि गाडी अखेरीस हॉस्पिटलमध्ये नक्की कशासाठी आली ? हे जाणून घेण्यासाठी लोक अगदी खिडक्यांतून वाकून बघायला लागले. कोणी हे दृश्य त्यांच्या केमेर्यात कैद करून घेत होते, कोणी फोटो काढत होते तर कोणी विडीयो, तर कोणी हा नजारा डोळ्यांत साठवून घेत होते.
गाडी तिकडे थांबली आणि त्यातून वधू वर खाली उतरले, ते तिकडे स्वतःची कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी आले होते. त्या दोघांची तिथे कोरोना टेस्ट झाली. सिरसाचे नागरीक हॉस्पिटलचे सिएमो डॉ सुरेंद्र नैन यांचे असे म्हणणे आहे की सगळ्यांनी या जोडप्याकडून शिकले पाहिजे जे लग्न झाल्यावर घरी न जाता टेस्ट करून घेण्यास आले. हे एक जबाबदार नागरिक असल्याचे लक्षण असून सगळ्यांनी हा आदर्श ठेवला पाहिजे. त्यांनी असे ही सांगितले की ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे किंवा होणार आहे त्यांनी आपापली कोरोना टेस्ट अवश्य करून घ्यावी.
शनिवारी सिरसा जिला प्रशासनकडून परवानगी घेऊन काही लोक वरात घेऊन पंजाबला गेले होते, जेव्हा मिडीयाने नवविवाहित जोडप्याशी संवाद साधला तेव्हा तेव्हा त्यांनी असे सांगितले की एक नागरिक म्हणून हे आमचे कर्तव्य आहे की टेस्ट करावी, किंबहुना प्रत्येक नागरीकाचे हे कर्तव्य आहे.