आंबे खाणे सगळ्यांनाच आवडते. बर्याच लोकांना फक्त पिकलेले आंबे खायला आवडतात आणि कच्च्या कैर्या ते खात नाहीत. पण बर्याच लोकांना हे माहिती नसते की कच्च्या कैरीचे सेवन केल्याने आपल्याला आरोग्याचे बरेच फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला कैरीचे काही असे फायदे सांगणार आहोत कि जे ऐकून तुम्हीही कच्ची कैरी खायला लागाल. पिकलेल्या आंब्याच्या तुलनेत कच्च्या कैरीचे सेवन करण्याचे बरेच फायदे आहेत. यांत असे बरे च गुण असतात जे शरीरातील कमी पूर्ण करून शरीराला स्वस्थ बनवतात. चला पाहूया हे कोणते फायदे आहेत ते
१. कैरीमध्ये विटामिन सी आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जर कैरी चिमुटभर मिठाला लावून खाल्ली तर तुमचे ती उन्हाळ्यापासून संरक्षण करते आणि शरीरात पाण्याचे प्रमाण राखून ठेवते ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.
२. उकडून घेतलेल्या कैरीच्या गरात थोडी साखर आणि जीरा पावडर मिसळून घेतल्याने उन्हाळ्याच्या अनेक विकारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकाल. याने त्वचेच्या आजारांपासूनही मुक्ती मिळते. कैरीमध्ये जेंथोन एंटीऑक्सिडेंट असते जे यूवी किरणांपासून आपल्या शरीराचे रक्षण करतात.
3. उन्हाळ्यात घामामुळे आपल्या शरीरात आयरन, सोडियम क्लोराइड यांसारख्या खनिजाचे प्रमाण कमी होते. कच्च्या कैरीचा रस प्यायल्याने हे नुकसान भरून निघते.
४. कच्ची कैरी शरीरातील पाण्याची कमी भरून काढते आणि ज्यामुळे पचन क्रिया वाढीस लागते. यांत एसिड असते ज्यामुळे गर्मीमुळे होणार्या पचनाच्या समस्या दूर होतात. यांत असलेल्या पैक्टिनमुळे डायरिया, बद्धकोष्ठता, बवासीर, अपचन , एसिडिटी यांसारख्या साधारण पोटाच्या समस्यांवर उपचार करणे सोपे होते.
५. अस्वस्थ करून टाकणाऱ्या गरमीच्या काळात कैरी चिरून काळ्या मीठाबरोबर खाल्ल्यास फायदा होतो आणि शांत वाटते.
६. कच्च्या कैरीत विटामिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे रक्ताच्या नवीन कणांची निर्मिती होते आणि शरीरात असलेली रक्ताची कमी भरून काढता येते. यांमुळे तुमच्या शरीरात नवीन रक्त तयार होण्यास मदत होते.
७. विटामिन सी व एंटीऑक्सिडेंट्स नी समृद्ध असलेली कैरी मीठ लावून खाल्ल्यास हिरड्या आणि दात मजबूत होतात. याने दातांचे आरोग्य उत्तम राहाते तसेच तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते, दातांचे विकार दूर होतात.