तुम्हालाही माहीत नसतील आंबा खाण्याचे हे खास 5 फायदे…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, तुम्हाला तर माहीतच आहे की, रसाळ पिकलेले आंबे खायला खूप चवदार असतात. आणि तेवढेच ते आकर्षक देखिल दिसतात. विशेषतः उन्हाळ्यात त्यांचे आगमन झाल्याबरोबरच घरोघर आंब्याचे पदार्थ बनवले जातात. आंब्याचे आमरस, आंब्याचे लोणचे … आणि सर्वांत उत्तम म्हणजे त्यांना कापून खाल्ले जाते. आपण प्रत्येक वर्षी या ऋतूमध्ये आंबे तर खातोच पण तुम्हाला माहित आहे का की आंबे खाल्याने आपल्याला त्यापासून खूप फायदे होतात, आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला आंबे खाण्याचे 5 महत्वाचे फायदे सांगणार आहोत तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

1. आंबा खाण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे आंबा त्वचेला आतून साफ करतो. आंब्यात भरपूर प्रमाणात बीटा-कॅरोटीन आणि विटॅमिन ए असतं. आंब्यात असणारे कॅरोटीनॉइड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते. पिकेलला आंबा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. त्यात भरपूर प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट आणि योग्य प्रमाणात साखर असते.

2. आंबा हा आपल्या शरीरातील वायू आणि पित्त नष्ट करणारा आहे, परंतु हा एक कफकारक आहे, याशिवाय आंबा आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करतो आणि भूक वाढवतो. व आंब्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते.

3. ज्याला शुक्रप्रमेह आदी विकारांमुळे संतान प्राप्ती होत नाही, त्यांच्यासाठी पिकलेला आंबा खूप फायदेशीर आहे. कलमी आंब्याच्या तुलनेत देशी आंबा लवकर पिकणारा, ट्रायटोसिक असून त्यामध्ये विशेष गुणधर्म आहेत. तंतुमय, गोड, छोटा किंवा लहान कुई असणारा आंबा खाण्यास उत्तम मानला जातो.

4. पोट, यकृत, फुफ्फुसाचा आजार आणि अल्सर, अशक्तपणा इत्यादी आजारांसाठी आंबा खूप फायदेशीर आहे. आंबा विटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्त्रोत असल्याने शरीराला हायड्रेटेट ठेवतो. शरीराचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो.

5. युनानी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पिकलेला आंबा आळशीपणा दूर करतो, लघवी स्वच्छ करतो, क्षयरोग (टीबी) मिटवतो आणि हा मूत्रपिंड व मूत्राशयासाठी शक्तिशाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *