आपल्याला सगळ्यांनाच अगदी सलग आठ तास शांत झोप लागते असे नाही. बरेचदा असे होते कि काही ना काही कारणाने आपली झोप मोडते. ही झोप मोडण्याच्या वेळा असतात. आणि प्रत्येक वेळेचे आपापले संकेत असतात. कधी कधी आपल्याला पहाटे तीन ते पाचच्या मध्ये जाग येते. आता प्रश्न असा आहे कि या वेळेला जर झोपमोड झाली तर ते चांगले असते का ? काय आहेत यया मागचे संकेत ? तर चला जाणून घेऊया.
आपल्याला सवय आहे म्हणून बरेचदा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो पण हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण आहे आणि ते जाणून घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुमची ३-५ या वेळेत झोपमोड होत असेल तर त्यामागचे संकेत काय आहेत ते. हे ऐकून नक्की तुम्हाला फार आश्चर्य वाटेल.
जर सतत तीन ते पाच या वेळेत पहाटे तुमची झोपमोड होत असेल तर हे काही साधेसुधे नाही तर एका दिव्य शक्तीशी संबंधित आहे. पहाटे तीन ते पाचच्या मधील जो वेळ असो त्याला अमृतवेळ म्हंटले जाते. या वेळेत काही अलौकिक शक्तींचा वावर असतो. या अलौकिक शक्ती तुम्हाला काही इशारा करत असतील फक्त तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. ही अलौकिक शक्ती सगळ्यांची झोपमोड करत नाही तर फक्त त्यांचीच झोपमोड करत असते ज्याना ती खुश पाहू इच्छीते. याचा एक अर्थ असा होतो कि जर या वेळेत तुमची सतत झोपमोड होते तर याचा अर्थ ती शक्ती तुम्हाला चांगला इशारा करते आहे.
ज्या लोकांची झोपमोड या वेळेत होते त्यांना धनधान्य तसेच समृद्धी प्राप्त होते. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. यांमुळे फ्रेशही वाटते, आणि दिवस चांगला जातो. जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुमची झोपमोड मध्येच होते तर लक्षात घ्या कि तुम्हाला घड्याळ बघायचे आहे म्हणजे त्यामागचा संकेत तुम्ही नक्की ओळखू शकाल.
काही लोकांचा यावर विश्वास बसत नाही, ते ह्याला अंधश्रद्धा समजतात. पण तसे कधीही नसते. खरे असे आहे कि शास्त्रात जे काही सांगितले आहे ते कधीही खोटे नसते त्यावर विश्वास ठेवायचा असतो. सकाळची ही वेळ खूप चांगली आहे आणि म्हणूनच या वेळेत जर तुमची झोप मोडत असेल तर नक्की हा विचार करा कि काही चांगले आणि आनंददायी घडणार आहे आणि ही त्याची नांदी आहे.