वाईट काळ चालू आहे घाबरू नका फक्त या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…

आपल्या जीवनचक्रात जसा चांगला काळ असतो तसा वाईटही. चांगला काळ जसा जास्त टिकत नाही तसाच वाईटही टिकत नाही, पण त्याचे पडसाद मात्र नक्की ठेवून जातो. अशा काळात मन शांत ठेवणे आणि खंबीर राहाणे खूप आवश्यक आहे. काळाचे सामर्थ्य फार मोठे आहे. वाईट काळ आपल्याला बरेच काही शिकवून जातो. काळाच्या पुढे कोणाचेच काही चालत नाही, मग तो माणूस लहान असो अगर मोठा, श्रीमंत असो वा गरीब.

हे काळाचे चक्र मोठे अजब आहे. याची ताकत इतकी मोठी आहे कि हे गरीबाला श्रीमंत किंवा श्रीमंताला गरीब बनवू शकते. चांगल्या काळात लोक आपल्याबरोबर असतात तर वाईट काळात लोक आपल्याला विसरतात, आपली साथ सोडून देतात. अशा वेळी डगमगून न जाता धीराने सामना केला तर नक्की तुम्ही यातून पार पडाल. जर काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात तर नक्की तुम्ही यातून सुखरूप पार पडाल यांत काही शंकाच नाही.

अपेक्षा ठेवू नका : वाईट काळात सगळ्यात आधी स्वार्थी लोक तुम्हाला सोडून निघून जातील. त्यांच्या जाण्याचे दुःख न करता जे लोक अजूनही तुमच्याबरोबर आहेत त्यांचा विचार करा आणि पुढे व्हा. जे लोक तुमची साथ देत नाहीत त्यांचा जास्त विचार करू नका.

विचार करू नका  : अतिविचार करू नका. जे व्हायचे ते होईल, काळजी करून खिन्न होऊ नका. सकारात्मक विचार मनात आणायचा विचार करा.

ध्यान करा : ध्यान किंवा मेडीटेशन केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल. याने नकारात्मक विचार दूर होऊन तुम्ही सुखी व्हाल.

छंद जोपासा : हा एक उत्तम मार्ग आहे जो किमान काही काळासाठी तुम्हाला तुमचे दुःख विसरायला लावतो. तुमची आवडती गाणी ऐका किंवा पुस्तक वाचा. कधी फिरायला जा किंवा फोटो काढा. यांत मन रमवल्याने तुमचे मानसिक आरोग्य नक्की चांगले राहील. तुमच्या छंदासाठी वेळ दिलात तर नक्की तुमचा फायदा होणार आहे.

चांगली संगत  ठेवा: चांगली संगत ठेवलीत तर नक्की तुम्हाला फायदा होईल. वाईट संगतीच्या लोकांमध्ये मिसळू नका, खरे तर त्यांच्यापासून लांब राहा. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्याने तुम्हाला फायदा होईल. आपल्या जवळच्या व्यक्तींशी गप्पा मारा किंवा त्यांना फोन करा म्हणजे तुम्हाला चांगले वाटेल.

आम्ही सांगितलेल्या ह्या गोष्टी जर तुम्ही नीट लक्षात ठेवल्यात तर नक्की तुमचा वाईट काळ सुसह्य होईल आणि तुम्हाला त्रास होणार नाही. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि दुसर्यांनाही सांगा. हेही दिवस लवकर संपतील आणि एक सुंदर काळ तुमची वाट बघत असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *