अजय देवगण याची लाडकी मुलगी न्यासा आता १७ वर्षांची झाली आहे. तिचा जन्म २० एप्रिल २००३ साली मुंबई येथे झाला. अजय आणि काजोल आपल्या मुलीवर जीव ओवाळून टाकतात. ती अजयच्या खूप जवळ आहे आणि त्याची लाडकीही. काळाबरोबर तिच्या लुक्समध्ये खूप फरक दिसून येतो. आज तिच्या सौंदर्याची तुलना तिच्या आईबरोबर केली जाते. तिला मिल्क प्रोडक्ट्स फार आवडतात. तिच्या रंगावरून तिला सोशल मिडीयावर खूपच ट्रोल केले गेले आहे. जरी ती दिसायला सावळी असली तरी खूप स्मार्ट आहे. ती लहानपणी जरी एकदम अजयसारखी दिसत असली तरी आता ती काजोलसारखीही दिसते.
अजयने इंस्टाग्राम वर तीच फोटो टाकून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “हेप्पी बर्थडे बाळा, तुला खूप खूप शुभेच्छा “ असे लिहून या पोस्टमध्ये त्यांनी पत्नी काजोल हिलाही tag केले आहे. जो फोटो अजयने शेयर केलं आहे त्यात न्यासा फार सुंदर दिसत आहे. न्यास सिंगापूरला शिकते, तिला अभ्यासाची आवड तर आहेच पण त्याचबरोबर तिला पोहायची आवडपण आहे. १७ वर्षांची न्यासा सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते ती खूप समजूतदार असून प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करते.
आईबरोबरही तिचे उत्तम बॉंडिंग असून ती आईबरोबर सगळ्या गोष्टी शेयर करते. तिला चित्रपटात यायची इच्छा नसून तिला वर्ल्ड फेमस शेफ व्हायचे आहे. एका इंटरव्यूमध्ये काजोल हिने सांगितले कि ती बेकिंग शिकते आहे आणि तिला शेफ व्हायचे आहे. ती एकेक गोष्टी शिकत असून पाककलेत तिला विशेष रुची आहे. ती पुढे एक चांगली शेफ होईल यांत काही शंकाच नाही. तिला बेकिंग फार आवडते आणि ती त्यात विविध प्रयोग करते आणि बरेच काही शिकायची तिची इच्छा आहे. तिला या विषयात उच्च शिक्षण देण्याची तयारी या दोघांनी दाखवली आहे.
काजोल असेही सांगते कि तिच्या मुलांबाबत ती खूप प्रोटेक्टिव आहे आणि कोणी त्यांच्याबद्दल वाट बोललेले तिला चालणार नाही. आपल्या मुलांना तिने चांगल्या सवयी लावल्या आहेत आणि ती यांना पुरेसा वेळही देते. त्यांचे कुटुंब एक आनंदी कुटुंब आहे यांत काही शंकाच नाही.