पाटणकर ते ठाकरे असा आहे मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांचा जीवनप्रवास…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री चा हात असतो असे म्हणतात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजकीय यशामागे देखील त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. या दोघांची भेट कशी झाली आणि त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

शिवसेनेचे कार्य अध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात उद्धव ठाकरे यांनी अनेक चढ उतार अनुभवले आहेत, शिवसेनेची धुरा हाती घेतल्या पासून उद्धव ठाकरेंनीअनेक कसोटीचे क्षण अनुभवले, नारायण राणे यांचे बंड असो किंवा मराठीच्या मुद्यावरून मनसेने सुरवात केलेला झंझावत असो या सर्व कठीण काळात उद्धव ठाकरे यांना पत्नी रश्मी यांनी खंबीर साथ दिली.

रश्मी ठाकरे या मुळात शांत स्वभावाच्या व त्या निश्चयी देखील आहेत. त्या स्वतःला नेहमी कामामध्ये गुंतवून ठेवतात अशी माहिती त्यांचे काका दिलीप शृंगारपुरे यांनी एका मुलाखतीत दिली. रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबेवलीत एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला, लग्ना आधीचे त्यांचे नाव पाटणकर आहे 80 च्या दशकात त्यांनी डोंबेवलीच्या वझे तळेकर कॉलेजमधून पदवी मिळवली.

माधव पाटणकर यांचा कौटुंबिक व्यवसात आहे रश्मी ठाकरे यांच्यावर त्यांच्या आईवडील आणि सासु सासऱ्यांचा प्रभाव आहे, कौटुंबिक संस्कारांमध्ये मुले घडतात यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच सत्ता आणि लोकप्रियतेची हवा कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही असे शृंगारपुरे यांनी सांगितले. 1987 साली रश्मी ठाकरे LIC मध्ये नोकरीवर रुजू झाल्या कंत्राटी स्वरुपाची ही नोकरी होती. LIC मध्ये नोकरी करत असताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्या बरोबर मैत्री झाली जयवंती या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहीण आहेत.

जयवंती यांनी यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून दिली, उद्धव ठाकरे त्यावेळी फारशे सक्रिय न्हवते ते फोटोग्राफी करायचे, त्यांनी एका ऍड एजन्सी सुद्धा सुरू केली होती. या ओळखीचे रूपांतर नंतर मैत्रीत झाले, नंतर 13 डिसेंम्बर 1989 रोजी दोघे विवाहबद्ध झाले. रश्मी ठाकरे यांचा राजकीय निर्णयांमध्ये किती सहभाग आहे हे ठाऊक नाही पण शिवसेनेच्या कठीण काळात त्यांनी पक्षाला बांधून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली. आजही शिवसेनेच्या सर्व कर्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांचा वावर नक्कीच पाहायला मिळतो .

रश्मी ठाकरे… शिवसेनेच्या महिन्याभराच्या सत्तासंघर्षात ‘माँसाहेब-२’ म्हणून समोर येतायंत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची ओळख माँसाहेब म्हणून शिवसैनिकांसह अवघ्या महाराष्ट्राला आहे. पण आता मातोश्रीत रश्मी ठाकरेंच्या रूपानं ‘माँसाहेब-२’ अवतरल्यात आहेत, असं म्हटले तर वावगं होणार नाही.

रश्मी ठाकरे.. उद्धव ठाकरेंच्या अर्धांगिनी.. उद्धव यांच्या रणनीतीकार.. त्यांच्या मार्गदर्शक.. त्यांच्या खंद्या समर्थक.. असं म्हटलं जातं की वर्षा बंगल्याची महत्त्वाकांक्षा उद्धव यांनी बाळगली ती रश्मी ठाकरेंच्या आग्रहावरनंच. ग्राऊंड लेव्हलला पक्षात काय परिस्थिती आहे याचा लेखाजोखाच रश्मी ठाकरे ठेवतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *