स्त्री असो वा पुरुष दोघांसाठीही सकाळची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस सुखद आणि शांत व्यतीत होतो. यामुळे सकाळी कोणत्या गोष्टी कराव्यात ज्यामुळे तुमचा संपुर्ण दिवस चांगला जाईल याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही कामं सकाळी केल्याने दिवस चांगला जाईल आणि तुम्हाला कामांमध्ये यश मिळेल. जर काही चांगल्या गोष्टी सकाळी पाहिल्या तर दिवस चांगला जातो पण हेच जर तुम्ही वाईट गोष्टी पहिल्यात तर दिवस वाईट तर जाईलच पण तुम्हाला अडचणींचा सामनाही करायला लागेल. वास्तुशास्त्राप्रमाणे काही गोष्टींचे दर्शन सकाळी घेणे निषिद्ध किंवा अशुभ मानले गेले आहे.
सकाळी उठताच चरित्रहीन स्त्रियांचा चेहरा पाहू नये, यामुळे तुमचा पूर्ण दिवस दुःखात जाऊ शकतो. सकाळी उठल्याबरोबर लगेच आरसा पाहू नये कारण सकाळी शरीरात नकारात्मक उर्जा असते. म्हणून लगेच आरसा न पाहाता थोड्या वेळाने पाहावा. डोळे उघडताच शक्यतो कोणाचा चेहरा पाहू नये. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव असतात तसेच आपलेही होतात म्हणून तसे करू नये.
स्त्रियांनी हे नक्की वाचा –> सकाळी उठल्यानंतर स्त्रियांनी हि कामे केलीच पाहिजेत
तुमच्या आवडत्या देवाचे स्मरण सकाळी उठल्यावर लगेच केलेत तर त्याच्या आशीर्वादाने तुमचा दिवस खूप चांगला जाईल.
सकाळी उठल्या उठल्या जर शंख किंवा घंटेचा नाद कानावर पडला तर त्याने सकारात्मक उर्जा निर्माण होते. सकाळी उठल्या उठल्या तुमचे हात जोडून “कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥” हा मंत्र म्हणावा म्हणजे तुमचा दिवस चांगला जाईल. लक्ष्मी सरस्वती वगैरे देवतांचे स्मरण करणे चांगले असते. सकाळी नाश्ता करताना कोणत्याही पशूचे किंवा गावाचे नाव घेऊ नका. ते चांगले नसते, यांमुळे तुमचा दिवस खराब जाईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.