मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती बॉलिवूडमधील डिस्को डान्सरच्या नावाने प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमध्ये एकेकाळी त्यांचे डायलॉग आणि डिस्को डान्स स्टाईलचे बरेच चाहते होते. अभिनयाबरोबरच मिथुन हे एक गायक, राज्यसभेचे सदस्य, समाजसेवक आणि चित्रपट निर्मातेही आहेत. त्यांच्या अभिनयाच्या जेवढे कौतुक करू तेवढे कमीच आहे आणि म्हणूनच त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनय केल्याबद्दल 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 2 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.
कदाचित काही लोकांना हे माहीत नसेल की मिथुन यांना एक मुलगी देखील आहे जिला त्यांनी लहानपणी दत्तक घेतले होते. खरे तर, मिथुनला बातमी मिळाली होती की कोणीतरी एका जन्मलेल्या बाळाला कचरापेटीत टाकून गेले आहे, आणि मिथुनने ही बातमी ऐकताच त्या मुलीला दत्तक घेऊन तिला आपले नाव देण्याचा निर्णय घेतला. व त्या मुलीचे नाव दिशानी चक्रवर्ती आहे. दिशानी आता मोठी आणि दिसायला खूपच सुंदर आहे आणि विशेष म्हणजे ती आता लवकरच आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवणार आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची रेस लागली आहे. जशी बी टाऊनमध्ये स्टार किड्सची एन्ट्री सुरू आहे. एकीकडे सारा, जान्हवी आणि अनन्यासारख्या स्टार किड्सनी एन्ट्री घेतली आहे. आणि त्याच बरोबर असे देखील लोक आहेत जे आता एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहेत. यापैकी एक नाव मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानी हिचे आहे.
दिशानी देखील आता बॉलिवूडमध्ये येण्याची तयारी करत आहे. बऱ्याच वेळा दिशानीचे काही फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
मित्रांनो तुम्हाला मिथुन चक्रवर्तीची मुलगी कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.