सुनील शेट्टी बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने आत्तापर्यंत 120 हून अधिक चित्रपट केले आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की, सुनील शेट्टी यांचा जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी झाला होता. नंतर त्यांनी 1992 मध्ये रिलीज झालेल्या “बलवान” चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली. परंतु आजकाल सुनील शेट्टी चित्रपटांपेक्षा स्वतःच्या बिजनेस मध्ये जास्त लक्ष देत आहे. आज आम्ही तुम्हाला सुनील शेट्टी यांच्या पत्नीबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत, तर चला त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
सुपरस्टार सुनील शेट्टी यांच्या पत्नीचे नाव मोना शेट्टी आहे. मोना शेट्टी ही क्रिएटिव्ह डायरेक्टर, फॅशन डिझायनर आणि समाजसेविका देखील आहे. त्यांचा जन्म ऑगस्ट 1965 रोजी झाला होता. सुनील शेट्टी आणि मोना शेट्टी यांचे 1991 साली लग्न झाले.
तुम्हाला सांगू इच्छितो की मोना शेट्टी ही सोशल मीडिया पेक्षा सामाजिक कार्यात व गरिबांना मदत करण्यात अधिक व्यस्त असते. , मोना शेट्टी ‘सेव्ह द चिल्ड्रन इंडिया’ची विश्वस्त देखील आहे.
मित्रांनो तुम्हाला मोना शेट्टी आणि सुनील शेट्टी याच्या सुंदर जोडी बद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.