मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती चांगल्या लोकांसोबतच नेहमी वाईट का घडते ? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. मी कोणाविषयी वाईट बोलत नाही, माझ्या मनात कोणाविषयी वाईट भावना नसते, मी सर्वांचे चांगले व्हावे असाच विचार करत असतो. पण तरी देखील माझ्यासोबत खडतर घटना का घडतात ? मी तर नेहमी नितीमताचे आचरण करतो, तरीही माझ्या बरोबरच असे का ? चांगले कर्म करणारे नेहमी दुःखी राहतात, आणि वाईट काम करणारे नेहमी आनंदी राहतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही असे का घडते ? मनुष्याच्या या प्रश्नावरती भगवंताने खूप सुंदर उत्तर दिले आहे, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की, हे भगवंता…. नेहमी चांगल्या व खऱ्या माणसासोबत वाईट का होते?. या प्रश्ना वरती श्री कृष्णाने अर्जुनाला एक गोष्ट सांगितली या गोष्टीमध्ये मनुष्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ते बोलतात की एका नगरामध्ये दोन मनुष्य राहत होते, त्यातील पहिला व्यापारी होता व तो चांगला माणूस होता तो खूप धार्मिक वृत्तीचा होता. त्याबरोबरच प्रामाणिक देखील होता. व तो प्रामाणिक पणे आपला काम धंदा करून, आनंदात आपले जीवन व्यतीत करत होता. रोज मंदिरात जाणे, देवांची पूजा आरती करणे, व त्यानंतर आपल्या दिवसांची सुंदर सुरुवात करत होता, हा त्याचा रोजचा दिनक्रम होता. दुसरा माणूस खूप दुराच्यारी होता, त्याला दुसऱ्यांना त्रास देण्यातच आनंद वाटत असे.
लोकांचा छळ करणे, त्यांना लुटणे हेच त्याचे काम होते. तो असुरी प्रवृत्तीचा होता. तो देवतांना मानत नसे. तो देवतांचे नाव देखील कधीही घेत नसे. परंतु तो अधून मधून मंदिरात जात असे. कारण त्याला मंदिरातील पैसे चोरायचे होते. एकदा त्या गावात खूप पाऊस पडत होता. कोणीही घराबाहेर गेले नाही, सगळीकडे चिखल झाला होता. या संधीचा फायदा घेऊन तो चोर त्या मंदिरात गेला, व मंदिरातील दानपेटी फोडून पैसे घेऊन पळून गेला. थोडया वेळात तो व्यापारी रोजच्या प्रकारे मंदिरात आला. व्यापारी आत गेला त्याच्या पाठोपाठ पुज्यारीही आत गेला. दानपेटी फोडलेली आहे आणि त्यात काहीही नाही. हे बघून पुजारी जोरात ओरडला, पुजारीचा आवाज ऐकून सर्व लोक तिथे जमा झाले. व व्यापाऱ्यांवर संशय घेऊन त्याला बोलू लागले. त्या व्यापाऱ्याने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे कोणी ही ऐकून घ्यायला तयार नव्हते.
व्यापाऱ्याला खूप वाईट वाटले. तो व्यापारी मंदिरातून बाहेर पडला. रस्ताने जात असताना त्याला एका गाडीने धडक दिली व त्याला खूप लागले. त्याचे अंग दुखू लागले. तो तसाच उठून चालू लागला. तर दुसरीकडे तो चोर पैसे घेऊन पळत होता, व वाटेत त्याला रस्त्यात एक पैशाचे गाठोडे सापडले. तो खूप खुश झाला व पळू लागला आणि म्हणाला की, आजचा दिवस खूप लकी आहे, मंदिरातील दानपेटीतील इतके पैसे मिळाले, आणि आता रस्त्यात गाठोडे सापडले….
मी तर आज करोड पती झालो. हे वाक्य त्या व्यापाऱ्याच्या कानावर पडले. त्याला खूप वाईट वाटले. आपण भगवंताची खूप पुजा आरती करतो. सर्व कामे खूप प्रामाणिक पणे करतो. कोणाविषयी काही वाईट बोलत नाही याचे आपल्याला असे फळ मिळाले का? हा प्रश्न त्याला सतवू लागला. आणि तो घरी निघून गेला. घरातील देवाचे सर्व मूर्ती व फोटो काढून टाकले. त्याचा देवावरील विश्वास डगमगळला बरीच वर्षे गेली कालांतराने दोघांचा मृत्यू झाला.
यमराज दोघांना बरोबर घेऊन जात असताना, व्यापाऱ्याने यमराज यांना विचारले, मी तर नेहमी चांगलेच कार्य केले काहीही वाईट केले नाही तरीही माझ्यासोबत असे का घडले. आणि हा माणुस तर नेहमी दुसऱ्याचे वाईट करत असे, नेहमी चोरी, लबाडी करत असे तरी देखील त्याला गाठोडी आणि मला दुःख का? तेव्हा यमराज ने त्यांना सांगितले, त्या दिवशी तुझ्या सोबत जी दुर्घटना घडली तो दिवस तुझ्या मृत्यूचा दिवस होता, परंतु तुझे वागने आणि देवावरचा विश्वास त्यामुळे तुझा मृत्यू टाळला. त्यातून तू सुखरूप बाहेर पडला आणि हा जो चोर आहे याचा त्याच दिवशी राजयोग होता.
परंतु त्याचे वाईट वागणे व भगवंताला न मानने यामुळे त्याचा राजयोग थोड्या पैशांमुळे थांबला. त्याला पैसे मिळाले पण राजयोग कधीही मिळाला नाही. हे ऐकल्यानंतर व्यापारी मनातल्या मनात हसू लागला. श्रीकृष्ण सांगतात की आपण केलेले चांगले व वाईट काम याचे फळ आपल्याला अवश्य मिळते. देव आपल्याला कोणत्या रुपात काय देईल हे सांगता येत नाही.
तर मित्रांनो तुमच्या सोबत काही वाईट घटना किंवा कोणती संकटे येत असतील तर असे समजूनका की देव तुमच्या सोबत नाही आणि त्यामुळे तुमच्या सोबत वाईट होत आहे. त्याऐवजी असा विचार करा की आपल्या सोबत ह्या पेक्षा वाईट घडले असते परंतु आपल्या चांगल्या वागण्यामुळे किंवा आपली देवावरती जी श्रद्धा आहे त्यामुळे हे थोडक्यात निभावले. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.