या मुलांच्या अंतिम संस्काराला गेलेल्या वडिलांनी पाहिले असे काही की सर्वांचेच होश उडाले….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, या जगामध्ये जी व्यक्ती जन्माला येते त्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित आहे. आणि हा सृष्टीचा नियम आहे, म्हणून एखाद्याचा व्यक्तीचा कधी मृत्यू होईल याचा अंदाज कोणीही घेऊ शकत नाही कारण जीवन आणि मृत्यू हे देवाच्या हाती आहे आणि तेच निर्णय घेतात की कोणी किती काळ जगावे. जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यकाळ निश्चित केलाला असतो. परंतु आज आम्ही तुम्हाला या मृत्यूच्या पलीकडे असलेल्या देवाच्या चमत्काराबद्दल सांगणार आहोत, हे जाणून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल.

वास्तविक, ही गोष्ट समोर आली आहे ती हरियाणामधील यमुनानगरची आहे आणि या ठिकाणी जे घडले ते एका चमत्कारापेक्षा काही कमी नाही व ते पाहून तेथील सर्व लोकांना आश्चर्य वाटले. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. खरे तर जी आई आपल्या मुलाला जन्म देते. त्या आईला नेहमी असेच वाटत असते की आपल्या मुलाला दीर्घआयुष्य प्राप्त होवो, प्रत्येक आई मुलाला जन्म देण्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी करते. म्हणून तिला वाटत असते की आपला मुलगा नेहमी आपल्या सोबतच असावा. आता तुम्ही थोडा विचार करा की जर एखाद्या बाळाचे जन्माला आल्यानंतर फक्त काही मिनिटांतच किंवा जन्माला येताच आयुष्य संपले तर…..! त्या बाळाला जन्म दिलेल्या आईला काय वाटेल किंवा तिची काय अवस्था होईल.

अशीच एक घटना घडली आहे जन्मलेल्या या मुली सोबत, खरे तर मुलीच्या डिलिव्हरी नंतर लगेच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ज्यानंतर हिंदू धर्माच्या प्रथेनुसार मृत्यूनंतर बर्‍याच विधी केल्या जातात, काही लोकांनी असे म्हंटले आहे त्या विधी करण्यामागील कारण हे आहे की एखादी व्यक्ती या परंपरेत (विधी) पूर्ण करत असताना त्या व्यक्तीस दुःख विसरण्यास मदत होऊ शकते. येथे देखील असेच घडले जेव्हा डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले, तेव्हा त्या मुलीच्या वडिलांनी हृदयावर दगड ठेवून त्या बाळाला अंत्यविधीसाठी नेले, त्यानंतर शेवटी त्याला रहावले नाही व त्याने मुलीचा शेवटचा चेहरा पहायचा म्हणून तिच्या चेहऱ्यावरील पॉलिथीन काढले व ते काढताच त्या मुलीच्या वडिलांना तिला पाहून आश्चर्याचा धक्का बसला.

कारण डॉक्टरांनी ज्या मुलीला मृत घोषित केले होते त्या मुलीचे तर डोळे उघडलेले होते आणि ती हात झटकत होती. हे पाहिल्यानंतर त्या मुलीचे वडिल खूप आनंदी झाले. त्यानंतर बाळाला दाखविण्यासाठी पुन्हा डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केल्या व ती पूर्ण पणे चांगली आहे असे सांगितले व हे ऐकून तिचे आईवडील खूपच खुश झाले आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे असे म्हणणे आहे की देवाने या मुलीला दुसरा जन्म दिला आहे, कदाचित त्या मुलीने मागच्या जन्मी खूप पुण्यकर्म केले असतील देवाचा असा चमत्कार यापूर्वी कोणीही पाहिला नव्हता, म्हणून तेथे उपस्थित प्रत्येकाला ती मृत मुलगी पुन्हा जिवंत झालेली पाहून आश्चर्य वाटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *