बॉलीवूड सुपरस्टार गोविदाची भाची आहे खूपच सुंदर, सध्या करते हे काम….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती,90’s च्या दशकात चित्रपट जगातील सुपरस्टार असलेल्या गोविंदा यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये गोविंदा आणि डेव्हिड धवनची जोडी ही यशाचे आणखी एक नाव होते. गोविंदानंतर त्यांची मुलगी टीना आहूजा देखील या चित्रपटत सृष्टीत आली, ती सध्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम करत आहे. पण आपल्या सर्वांना माहित आहे की आजकाल लोक मोठ्या पडद्यावर तसेच छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या अभिनेत्रींना देखील पसंत करतात, कारण छोट्या पडद्याची अभिनेत्री देखील बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्रीशी स्पर्धा करत असते. आपल्या देशात जितके लोक बॉलिवूड कलाकारांवर प्रेम करतात, तितकेच ते लहान पडद्यावरील कलाकारांवर देखील करतात.

पण मित्रांनो, काही अशा टेलिव्हिजन अभिनेत्री देखील आहेत ज्या बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा जास्त प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांच्या भाचीबद्दल सांगणार आहोत जी टेलीव्हिजनच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. कदाचित तुम्ही देखील तिचे बरेच शो पाहिले असतीलच पण आज तुम्हाला हे समजेल की ही अभिनेत्री बॉलिवूड मधील अभिनेता गोविंदाची भाची आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो की गोविंदाच्या भाचीचे नाव रागिनी खन्ना आहे, जी दिसायला खूपच सुंदर आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की तिने आपल्या करिअरची सुरूवात राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’ या मालिकेतुन केली होती. यानंतर ‘‘ससुराल गेंदा फूल’ मध्ये सुहानाची भूमिका साकारून तिने बरीच लोकप्रियता मिळविली.

कॉमर्स ची मास्टर डिग्री
मिळविणार्‍या रागिनीने सुमारे 25 जाहिरात एजन्सीमध्ये काम केले आहे. रागिनीचे गायिका बनण्याचे स्वप्न होते पण तिच्या नशिबात अभिनेत्री होणे हेच लिहिले होते. रागिणीने गाणे गाण्याचे प्रोफेशनल ट्रेनिंग देखील घेतले होते.

जेव्हा तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले तेव्हा लोकांना तिचा अभिनय खूपच आवडला आणि यानंतर तिच्या टीव्ही वर्ल्ड मधील करियरची सुरवात झाली. रागिनी झलक दिखला जा मधील पाचव्या सिजन मध्ये सर्वात जास्त ओटिंग मिळणाऱ्या डान्सर्स पैकी एक डान्सर्स होती.

टीव्ही शो ‘ससुराल गेंदा फूल’ नंतर, रागिनीला अखेर लाइफ ओकेच्या कुकरी शो वेलकम-बाजी मेहमान-नवाजी मध्ये पाहण्यात आले होते. तुम्हाला सांगू इच्छितो की रागिणीने अनेक मोठे कार्यक्रम केले आहेत ज्यामध्ये ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ चा समावेश आहे. , ‘झलक दिखला जा’, ‘गैग्स ऑफ हसीपुर’, ‘भास्कर भारती’ यांचा समावेश आहे.

सलमान खानच्या होस्टेड शो दस का दममध्ये रागिनीने 10 लाख रुपये जिंकले आणि नंतर ते पैसे तिने दान केले. छोट्या पडद्याशिवाय रागिणीने मोठ्या पडद्यावर देखिल काम करण्याचा प्रयत्न केला. रागिणीने राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘तीन थे भाई’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते, परंतु दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तथापि, रागिनी बर्‍याच दिवसांपासून अशा कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टचा भाग बनली नाही ज्यामुळे तिचे करिअर अचानक बदलून जाईल.

तुम्ही तिचे फोटो पाहून अंदाज लावू शकता की ती किती सुंदर आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की रागिणी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि तिचे चाहतेही लाखात आहेत आणि रागिणी अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी स्वत: ची छायाचित्रे शेअर करत असते.
मित्रांनो तुम्हाला रागिणी कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *