तेरे नाम चित्रपटात वेड्या मुलगीची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री, सध्या करते हे काम…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती,जर तुम्हाला सलमान खानचे चित्रपट आवडत असतील किंवा तुम्ही सलमान खान चे मोठे फॅन असाल तर तुम्ही “तेरे नाम” हा चित्रपट नक्की पाहिला असालच, सलमान खानचा हा सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. आज आम्ही तुम्हाला त्या चित्रपटा संबंधी एक अनोखी गोष्ट सांगणार आहोत. चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका निभावणाऱ्या व्यक्तींना आपण ओळखत तर असतोच, परंतु आपण बर्‍याच वेळा असे पाहतो की त्या चित्रपटात अशी काही पात्रे असतात जे साईड रोल करत असताना देखील त्यांच्या अभिनयातून ते लोकांचे लक्ष केंद्रित करतात.

तेरे नाम चित्रपटामध्ये देखील एका अभिनेत्रीने असेच एक पत्र साकारले आहे जीचे नाव रोशनी चौधरी आहे, तुम्हाला या चित्रपटातील सर्व पात्रे आठवत असतीलच, परंतु आम्ही तुम्हाला या चित्रपटातील एका अशा व्यक्तिरेखेबद्दल सांगत आहोत जी फक्त थोड्याच मिनिटांसाठी पडद्यावर दिसली होती, तेरे नाम चित्रपटातील हा सिन तुम्हाला नक्कीच आठवत असेल. एका सिन मध्ये सलमान म्हणजेच राधे भैय्या एका वेड्या मुलीला चहा प्यायला देतो आणि जेव्हा त्याच्या समोर गुंड तिची छेड काढतात तेव्हा तो त्यांना चांगलाच धडा शिकवतो…..! तुम्हाला ती वेडी मुलगी आठवते का?

या चित्रपटात जरी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भूमिका चावला दिसत असली तरी या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री होती जिने वेड्या मुलीच्या भूमिका साकारली होती. चित्रपटात असा एक सिन दाखवण्यात आला होता की काही मुले एका वेड्या मुलीची छेड काढत होते, व त्यानंतर सलमान खान या मुलीला वाचवतो. हा सिन खूपच छान होता. आणि त्या वेड्या मुलीची भूमिका रोशनी चौधरी ने साकारली होती. तुम्हाला सांगू इच्छितो की रोशनीने अनेक चित्रपटांमध्ये छोटी छोटी भूमिका साकारली आहे.

 

तसे, तर फारच कमी लोक रोशनी ला ओळखत असतील. रोशनी एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. याशिवाय रोशनीने साउथ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत रोशनीने 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु ही एक वेगळी गोष्ट आहे की तिला फार मोठा सिन भेटलेला नाही, पण तिच्या उत्तम अभिनयाने तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तसेच रोशनीला आतापर्यंत तिच्या सुंदर अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

तुम्हाला सांगू इच्छितो की अभिनेत्री रोशनीने बॉलिवूडबरोबरच साउथ इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. ती बर्‍याच तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये दिसली आहे पण वर्ष 2004 नंतर अचानक रोशनी चित्रपटसृष्टीपासून दूर निघून गेली. बॉलिवूडमधील बरेच मोठे मोठे स्टार्स तिला ओळखतात. अगदी तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

रोशनीने अचानक चित्रपटांमधील भूमिकांमध्ये काम करणे थांबवले आणि दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली. पण दिग्दर्शन क्षेत्रातही रोशनीला फारसे यश मिळवता आले नाही. आज ती चांगले सुखी जीवन जगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *