मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या Mahiti.in या वेबसाईट वरती, आज आपण पाहणार आहोत, देवाला दिवा लावताना आपण कोणत्या नियमांचं पालन केले पाहिजे. देवाची पूजा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे मानून आपण देवापुढे रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावतो. तर हा दिवा आपण जेव्हा देवासमोर लावत असतो, तेव्हा काही गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवायला हव्यात. मला वाटते की काही लोक नक्कीच अशा प्रकारे दिवा लावत असतील, पण काहींना कदाचित हे माहीत नसेल. म्हणून आज आपण ह्या गोष्टी समजून घेणार आहोत की देवापुढे दिवा कसा लावायचा ज्यामुळे तुमच्या घरात नेहमी शांतता नांदेल.
मित्रानो दिवा कोणताही लावा तेलाचं लावा किव्हा तुपाचा लावा मात्र हा दिवा आपण देवासमोर लावायलाच हवा. आपण जर तेलाचा दिवा वापरात असाल तर तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा. म्हणजे मंदिरात ठेवताना तो आपल्या डाव्या हाताला असुद्या..जर आपण तुपाचा दिवा लावताय तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा.
मित्रानो तेलापेक्षा तुपाचा दिवा लावणं कधीही चांगलं असत..कारण तुपामध्ये सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण तेलापेक्ष्या खूप जास्त असत. आपली जी इच्छा असेल, आपली जी आकांक्षा असेल, महत्वकांक्षा असेल,आपली जी स्वप्ने असतील, आपलं देवाकडे जे काही मागणं असेल, ते जर लवकर पूर्ण करून घ्यायचा असेल तर श्रद्धे बरोबरच हा तुपाचा दिवा देखील आपल्याला मदत करू शकतो. मात्र हे तूप घेताना शक्यतो देशी गाईचे घ्या. ते जर मिळत नसेल तर आपण इतर कोणतंही तूप वापरू शकता. दुसरी गोष्ट दिवा लावायचा की निरांजन लावायचं? मित्रांनो दोन्हीही चालतील काहीच अडचण नाही. मात्र एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा निरांजन जर आपण लावलं तर ते 24 तास जळत राहिले पाहिजे. म्हणजे ते विजता कामा नये..दिवा अगदी 5 ते 10 मिनिटे चालून विजला तरी चालतो. ज्यांना शक्य होईल त्यांनी निरांजन वापरा, ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी दिवा वापरा.
पुढची गोष्ट अशी की जी वात असते दिव्याची ती नेमकी कोणत्या दिशेला ठेवायची..? मित्रानो जर आपल्या आयुष्यात जर धन लाभ पाहिजे असेल तर, आपण या वातीची दिशा उत्तर बाजूला ठेवावी. जर आपल्या घरामध्ये सारख कोणी ना कोणी तरी आजारी पडत असेल तर, आपण या दिव्याची दिशा म्हणजे वातीची जी दिशा आहे, ती पूर्वेकडे ठेवायला हवी. तर या दोन दिशा फार शुभ आहेत. उत्तर आणि पूर्व…ज्या उरलेल्या दोन दिशा आहेत पश्चिम आणि दक्षिण यातील जर आपण पश्चिम दिशेला वातीने तोंड केलं तर आपल्या जीवनामध्ये दुःखच दुःख येणार आहे. आणि जर दक्षिण दिशेला जर ही वात असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येऊ शकतात. कारण दक्षिण ही यमाची दिशा आहे. आणि दक्षिणेकडे आपण कधीही दिव्याची वात करू नये..
शेवटची गोष्ट जर आपल्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू असतील, इतके प्रॉब्लेम की त्यापासून सुटकाच मिळत नसेल, पैसे ही येत नाहीत, कटकटी चालू आहेत, असे जर खूप प्रॉब्लेम असतील तर आपण आपल्या देवासमोर तीन वाती असणारा दिवा लावा. तीन वाती त्यामध्ये ठेवा. त्या मध्ये देशी गाईचे तूप आवश्य वापरा याचे अतीशय सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील..तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती मध्ये सकारात्मक ऊर्जा येईल..घरामध्ये शांतता येईल.आणि हळूहळू तुमच्या घरामध्ये प्रगती होईल.. मला आशा आहे की तुम्हाला याचा नकीच फायदा होईल…
Faltu ahe asa asat tar koni mehanat kelich nasti…fakta dive lavat rahile asate…
Nice
Teen Vaticha diva lavla tar tya vatinchi disha kay havi